तिलक वर्मा(फोटो-सोशल मिडिया)
Tilak Verma’s statement after the Asia Cup tournament : आशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा पराभव केला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने परभव करून विजेतेपद आपल्या नावावर करण्यात आली. या सामन्याचा तिलक वर्मा हीरो ठरला आहे. त्याने ५३ चेंडूत नाबाद ९६ धावा केल्या होत्या. ज्यामुळे भारताचा विजय सोपं झाला. भारतीय संघ सुरुवातीच्या पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या पराभव जिव्हारी लागला आहे. अशातच आता भारताचा फलंदाज तिलक वर्मा याने एक विधान केले आहे. जे चर्चेत आले आहे.
हेही वाचा : IND VS PAK : ‘PCB ला फक्त लल्लू-कट्टू…’, आशिया कपमधील पराभव जिव्हारी; शोएब अख्तरने व्यक्त केला संताप
या विजयानंतर तिलक वर्माने एक विधान केले आहे. सामन्यानंतर तो म्हणाला की, “पाकिस्तानी खेळाडू बरेच काही बोलत होते. पण मला वाटले की मला फक्त माझ्या बॅटने त्यांना उत्तर द्यावे लागणार, सामन्यानंतर ते मैदानावर दिसले देखील नाहीत.”
तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी विकेट्स पडत असताना मैदानावर थांबून चांगलीभागीदारी रचली आणि भारताचा विजय अधिक सोपा केला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली, ज्यामुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. तिलकने दबावाखाली देखील उत्तम फलंदाजी केली आणि ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा फटकावल्या. दरम्यान, शिवम दुबेने देखील आक्रमक खेळ करत ३३ धावा काढून तो माघारी गेला. दुबेने विनोदाने म्हटले की, “मला वाटते की माझ्या बॅटनेही प्रतिसाद दिला; त्यांच्याकडे बोलण्यासाठी फारसे काही शिल्लक राहिले नव्हते.”
तिलक वर्माने पुढे म्हटले की भारतीय प्रेक्षकांचा उत्साह ही त्याची सर्वात मोठी ताकद बनली होती. तो म्हणाला की, “जेव्हा स्टेडियममध्ये ‘वंदे मातरम’चा जयघोष सुरू झाला तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. त्या क्षणी, मला ‘भारत माता की जय’ म्हणण्याची एकमेव इच्छा झाली होती. प्रेक्षकांचा उत्साह मला मैदानावर प्रेरणा देत राहिला.”
अष्टपैलू शिवम दुबेने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. अनुभवी हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत, त्याने भारतीय डावाची पहिली षटकं टाकली. त्याने संपूर्ण स्पर्धेत अचूक गोलंदाजी करून बोलणाऱ्यांची तोंड बंद केली. शिवम दुबे म्हणाला की, “माझ्या पाठीशी मेहनत आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे. भारतीय समर्थकांच्या आशीर्वादानेद देखील माझे मनोबल वाढवण्यात मदत केली. इतक्या मोठ्या सामन्यामध्ये योगदान देणे हा माझ्यासाठी खूप खास अनुभव राहील आहे.”
हेही वाचा : IND vs PAK : भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमनेसामने; वाचा कधी-कुठे होणार महामुकाबला?