मुंबई : वर्षाच्या सुरुवातीलाच भारत श्रीलंका यांच्यातील टी-२- मालिकेतील पहिल्या चित्तथरारक सामन्यात भारतान अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला आहे. शिवम (४/२२) आणि सामनावीर दीपक हुडाने (नाबाद ४१) शानदार खेळीतून मंगळवारी यजमान भारतीय संघाला सलामीला विजय मिळवून दिला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलामीच्या टी-२० सामन्यात दासुन शनाकाच्या श्रीलंका टीमला धूळ चारली. भारताने २ धावांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ गड्यांच्या माेबदल्यात श्रीलंकेसमाेर विजयासाठी १६३ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात श्रीलंकेला १६० धावांपर्यंत मजल मारता आली.
[read_also content=”नोटीबंदीचा निर्णय योग्य असा निर्वाळा न्यायालयानं दिल्यानंतर, बेकायदा तरीही निर्णय वैध! न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, सामनातून टिका… https://www.navarashtra.com/maharashtra/after-court-gave-the-decision-of-demonetisation-as-correct-the-decision-is-still-illegal-expressing-displeasure-with-the-court-decision-attacked-from-the-saamana-359086.html”]
दरम्यान, टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या टी 20 सामन्यात 2 धावांनी थरारक विजय मिळवलाय. श्रींलकेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. मात्र दुसरी चोरटी घाव घेण्याच्या प्रयत्ना धाव घेण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलिया 160 धावांवर ऑलआऊट झाली. त्याआधी भारताने दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं सन्मानजनक टार्गेट दिलंय. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला 150 पेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडता आला. टीम इंडियाकडून हुड्डाने नाबाद 41* आणि अक्षर पटेलने 31* धावा केला.
शिवम मावीने श्रीलंकेची सेट झालेली दासून शनाका आणि वानिंदु हसरंगा ही जोडी फोडून काढली आहे. मावीने हसरंगाला आऊट करत श्रीलंकेला सहावा झटका दिला आहे. वानिंदु 10 रन्स करुन आऊट झाला. श्रीलंकेने पाचवी विकेट गमावली आहे. हर्षल पटेलने भानुका राजपक्षाला 10 धावांवर कॅप्टन हार्दिक पटेलच्या हाती कॅचा आऊट केलं. त्यामुळे श्रीलंकेची 10.4 ओव्हरनंतर 68-5 अशी स्थिती झाली.
यासह भारताने घरच्या मैदानावरील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील निर्णायक दुसरा सामना उद्या गुरुवारी पुण्यात हाेणार आहे. युवा बिग्रेडने दमदार खेळीतून नव्या वर्षाची विजयाने सुरुवात करून दिली. पदार्पणामध्ये शिवमने चार बळी घेतले. यजमान भारतीय संघाच्या सलामीवीर इशान किशनने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध सलामीचा टी-२० सामना गाजवला. त्याने पहिल्याच षटकात १६ धावांची कमाई केली. यासह ताे पहिल्या षटकात १५+ अधिक धावा काढणारा भारतीय संघाचा तिसरा फलंदाज ठरला.