IND Vs IRE: टीम इंडियाचा आयर्लंडवर 2-0 ने विजय; तब्बल 116 धावांनी केला दणदणीत पराभव
Indian Cricket Women Team: भारतीय महिला संघाने आयर्लंड संघावर 116 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना देखील जिंकला आहे. दुसरा सामना जिंकून भारताने मालिका देखील आपल्या खिशात टाकली आहे. भारताची कर्णधार हनुमानप्रीत कौर हिला या मालिकेत मध्ये विश्रांती देण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाचे कर्णधार पदाची कमान स्मृती मंधनाकडे देण्यात आली आहे. भारत विरुद्ध आयर्लंड या मालिकेचा दुसरा सामना राजकोट येथे खेळवण्यात आला.
A 1⃣1⃣6⃣-run win! 👏 👏 A superb effort from #TeamIndia to take an unassailable lead in the ODI series against Ireland in Rajkot! 🙌 🙌 Updates ▶️ https://t.co/zjr6BQyBQI#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gwo462EDdY — BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
भारत आणि आयर्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने आयर्लंडला 371 धावांचे आव्हान दिले होते. मात्र आयर्लंडला केवळ 254 धावाच करता आल्या. दरम्यान भारताने आयर्लंडवर 116 धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. तसेच हा सामना जिंकून भारताने मालिका देखील आपल्या खिशात टाकली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने स्वतःचाच रेकॉर्ड मोडत 50 ओव्हरमध्ये 370 धावा केल्या. जेमीनाह रॉडरीग्सने 102 धावांची शतकी खेळी केली. तर प्रतिका रावळ, कर्णधार स्मृती मांधानाने अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाची नववर्षात विजयी सलामी
भारतीय महिला संघाने नवीन वर्षाची सुरुवात दमदार विजयाने केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने आयर्लंडविरुद्ध शानदार आसा विजय प्राप्त केला आहे . भारतीय महिला संघाने आयर्लंडवर 6 विकेट्सने विजयात मिळवला आहे. आयर्लंड महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताला 239 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने हे आव्हान केवळ 34 षटकांमध्ये पूर्ण केले.
मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू
संघाची वेगवान गोलंदाज रेणुकाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यात १० बळी मिळवून मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. बीसीसीआयनेही त्याला विश्रांती देण्याची घोषणा केली आहे. तिच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास होत आहे. भारतीय महिला संघाने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला आणि पाच वर्षांत प्रथमच घरच्या भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली. त्यानंतर संघाने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला. या विजयामुळे संघाचे आयर्लंडविरुद्धचे मनोबल मोठ्या प्रमाणात उंचावणार आहे.
आयर्लंडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या मालिकेला १० जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्याचे सर्व सामने राजकोटमध्ये होणार आहेत. हरमनप्रीतला गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिला पहिले दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळता आले नाहीत. तिसऱ्या टी20 मध्ये तो संघात परतला आणि त्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व केले. या मालिकेसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी, अनुभवी सलामीवीर स्मृती मंधाना हिची सोमवारी या महिन्यात आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या होम वनडे मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.
आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा छेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिष्ट, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतस साधू, सायमा ठाकोर, सायली सातघरे.