फोटो सौजन्य - चेस इंडिया सोशल मीडिया
चेस ऑलिम्पियाड २०२४ : चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये भारताच्या संघाने आतापर्यत अविश्वसनीय कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने आतापर्यत एकही सामना गमावलेला नाही तर महिला चेस संघाला आठव्या राउंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या पुरुष संघामध्ये पाच चेस भारतीय ग्रँडमास्टरचा समावेश आहे. भारताच्या पुरुष संघात डी गुकेश, विधीत गुजराथी, अर्जुन इरिगाईसी, दानेश्वर बरडीया, प्रज्ञानंधा या खेळाडूंचा समावेश आहे. महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर संघ सातव्या राऊंडपर्यत एकही सामना पराभूत झाला नव्हता. त्यामुळे भारताचा महिला संघ सुद्धा गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर भारताच्या पुरुष संघाने सुद्धा अजुनपर्यत एकही सामना न गमावता पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
भारतीय महिला संघामध्ये हरिका द्रोणवल्ली, दिव्या देशमुख, वांतिका अगरवाल, वैशाली आणि तानिया सचदेवा हा भारतीय महिला चेस संघ आहे. भारताच्या महिला संघाला पोलंडच्या संघाकडून २.५-१.५ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय महिला संघाचा या स्पर्धेमधील हा पहिला पराभव आहे. वैशालीला पोलंडच्या मोनिका सोकोकडून पराभव पत्करावा लागला तर हरिकाला अलिना काशालिंस्कायाकडून पराभव पत्करावा लागला. दिव्या देशमुखने तिचा गेम जिंकला, तर वंतिका अग्रवालने तिचा गेम ड्रॉ केला. दिव्याने या स्पर्धेत आठ फेऱ्यांमध्ये सहावा सामना जिंकला. तिने काळ्या तुकड्यांसह खेळत अलेक्झांड्रा माल्टसेव्हस्कायाला पराभूत केले. भारतीय संघ सतत पहिल्या स्थानावर आहे. संघाचे ८ पैकी एकूण १६ गुण आहेत. तर, उझबेकिस्तान आणि हंगेरी १४ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या ८ व्या फेरीत भारतीय पुरुष संघाने इराण संघाचा ३.५-०.५ ने पराभव केला. तत्पूर्वी अर्जुन एरिगायसी आणि गुकेश यांनी काळ्या मोहऱ्यांनी विजय मिळवला, तर विदित गुजराती यांनी पांढऱ्या मोहऱ्यांनी सामना जिंकला. शेवटच्या सामन्यात प्रज्ञानंदचा सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघाचे आता आठ सामन्यांत १६ गुण झाले आहेत.