आयपीएलच्या महालिलावाला सुरुवात, कोण होणार मालामाल, कोणाची किती लागणार बोली?
IPL Auction 2025 Live Updates: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएलचा लिलाव सुरू आहे. सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचा लिलाव परदेशात होत आहे. या लिलावात ५७४ खेळाडूंवर बोली लागणार आहे. या ५७७ खेळाडूंमध्ये ३६७ भारतीय आणि २१० परदेशी खेळाडू आहेत, ज्यात ४ सहयोगी देशांचे खेळाडू आहेत. या लिलावात सर्व संघांना एकूण फक्त २०४ खेळाडूंवर बोली लावता येणार आहे, त्यापैकी जास्तीत जास्त ७० विदेशी खेळाडू असतील. भारयतीय आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींचं याकडे लक्ष लागलं आहे.