बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही भारताला सुवर्णक्षण पाहायला मिळाला आहे. महिला लॉन बॉल संघाने प्रथमच पदक जिंकले आहे. या विजयासह 22 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात आता एकूण पदकांची संख्या 10 झाली आहे. 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच लॉन बॉलमध्ये भाग घेतला होता.
[read_also content=”राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य लिफ्ट कायदा, उर्जा विभागाच्या परिपत्रकानंतर सरकारचा निर्णय https://www.navarashtra.com/movies/my-statement-was-distorted-subodh-bhaves-explanation-after-the-beigh-crticized-nrps-311194.html”]
कॉमनवेल्थ गेम्सच्या 92 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय लॉन बॉल महिला संघाने पदक जिंकले आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये लॉन बॉल 1930 च्या सुरुवातीपासून खेळला जात आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, त्याने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत कधीच लॉन बॉलमध्ये पदक जिंकले नव्हते. पण आता इतिहासात प्रथमच भारताला या खेळात पदक मिळाले आहे. या स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाचा 17-10 असा पराभव करून भारतीय संघाने सुवर्ण पदक नावावर केले. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी टिर्की यांच्या टीमने सुवर्णपदक जिंकले.
[read_also content=”भारतीय सायकलपटू मीनाक्षीचा भयंकर अपघात https://www.navarashtra.com/sports/terrible-accident-of-indian-cyclist-meenakshi-during-the-competition-311041.html”]