
Asian Games 2026
नेमबाजी प्रकारात 50 मिटर रायफलमध्ये भारताने सिल्व्हर मेडल जिंकले आहे. ५० मीटर रायफल ३-पोझिशन या आव्हानात्मक प्रकारात ‘नीलिंग’ (गुडघ्यावर टेकून), ‘प्रोन’ (पोटावर झोपून) आणि ‘स्टँडिंग’ (उभे राहून) अशा तिन्ही पोझिशन्समध्ये तिन्ही भारतीय खेळाडूंनी कमालीचे नियंत्रण आणि आपले कसब दाखवून दिले. त्यामुळे भारताला पदक जिंकता आले.
तिलोत्तमा, विदरसा आणि आशी यांनी मिळून एकूण १७६३ पॉईंट्सची नोंद करत दुसरे स्थान पटकावले आहे. चीनने या प्रकारात गोल्ड मेडल जिंकले आहे. कझाकिस्तानच्या संघाने १७५४ पॉईंट्ससह तिसरे स्थान मिळवत कांस्यपदक जिंकले आहे. पात्रता फेरीत तिलोत्तमा सेनने ५९० पॉईंट्ससह तिसरे स्थान, तर विदरसा विनोदने ५८८ पॉईंट्ससह सहावे स्थान पटकावून वैयक्तिक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आशी चौकसे हिने ५८५ पॉईंट्ससह उत्तम लढा दिला. मात्र तिची वैयक्तिक फायनलची संधी थोडक्यासाठी राहिल्याचे दिसून आले.
INDIAN WOMEN’S TEAM WON SILVER IN 50M RIFLE 3 POSITIONS AT ASIAN GAMES! 🥈 The trio of Tilottama Sen, Vidarsa Vinod & Ashi Choukshey wins it for India! 🇮🇳 pic.twitter.com/eughoPLHfr — The Khel India (@TheKhelIndia) September 26, 2026
सांघिक रौप्यपदकामुळे भारतीय नेमबाजांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, आता सर्वांचे लक्ष तिलोत्तमा सेन आणि विदरसा विनोद यांच्या ‘इंडिविज्युअल फायनल’वर लागले आहे. त्यांचा सध्याचा चांगला फॉर्म बघता ते भारतासाठी आणखी एक पदक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला नीलिंग (गुडघ्यावर टेकून मारण्याची) पोझिशन विदरसासाठी काहीशी आव्हानात्मक ठरली. सुरुवातीचे काही शॉट्स चुकल्यामुळे तिच्या पॉईंट्समध्ये फरक पडला. ‘प्रोन’ आणि ‘स्टँडिंग’ टप्प्यात तिने अचूक निशाणा साधत शानदार पुनरागमन केले. तिलोत्तमा आणि विदरसा यांच्यासोबतच आशी चौकसे हिनेदेखील सुरुवातीच्या टप्प्यात अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळवत भारतीय संघाची आघाडी कायम ठेवली होती. या तिन्ही खेळाडूंच्या सांघिक कामगिरीमुळेच भारताला या प्रकारात रौप्यपदक पटकावता आले आहे.