Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepti Sharma Birthday : भारतीय महिला संघाचा कणा दीप्ती शर्मा! केले आहेत ‘हे’ मोठे कारनामे

भारतीय महिला संघाची भरवशाची खेळाडू दीप्ती शर्मा आज आपला २८ वा वावाढदिवस साजरा करत आहे. याअष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने भारतीय महिला संघाला अनेकवेळा एकहाती सामना जिंकून दिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 23, 2025 | 02:34 PM
Deepti Sharma Birthday: Deepti Sharma, the backbone of the Indian women's team! She has done 'these' great feats

Deepti Sharma Birthday: Deepti Sharma, the backbone of the Indian women's team! She has done 'these' great feats

Follow Us
Close
Follow Us:

Deepti Sharma Birthday : भारतीय महिला क्रिकेट संघाची महत्वाची खेळाडू दीप्ती शर्मा आज २३  ऑगस्ट रोजी आपला २८  वा वाढदिवस साजरा करत आहे. अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचा जन्म २४ ऑगस्ट १९९७ रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला. दीप्तीने वयाच्या ९ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. डावखुऱ्या मध्यम श्रेणीची फलंदाज आणि उजव्या हाताची ऑफ-स्पिन गोलंदाज दीप्ती शर्माने २०१४ मध्ये आपल्या वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय एकदिवसीय संघातमध्ये पदार्पण केले. २०१६ मध्ये शर्माने टी-२० मध्ये पदार्पण केले आणि २०२१ मध्ये कसोटी पदार्पण केले.

हेही वाचा : AUS vs SA : लुंगी एनगिडीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रचला इतिहास; कंगारूंच्या पाच विकेट घेताच बसला ‘या’ खास पंक्तीत

भारतीय संघाची विश्वासार्ह खेळाडू

दीप्ती शर्मा ही भारतीय संघासाठी नेहमीच एक विश्वासार्ह खेळाडू राहिली आहे. तिने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये अनेक वेळा भारतीय संघाला अडचणींमधून बाहेर काढण्याची मोठी कामगिरी केली आहे. केवळ संघाला अडचणींमधूनच बाहेर काढले नाही तर संघाला एकहाती विजय देखील मिळवून दिला आहे.

दीप्तीने भारतीय संघाकडून खेळताना ५ कसोटी सामन्यांमध्ये ४ अर्धशतकांसह ३१९ धावा फटकावल्या आहेत आणि २० विकेट्स देखील  घेतल्या आहेत. १०९ एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने २,३९२ धावा काढून १६ बळी देखीलक टिपले आहेत. ज्यामध्ये १ शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.  १२९ टी-२० सामने खेळले असून तिने १,१०० धावा केल्या आहेत, यामध्ये तिने २ अर्धशतक लागावळी असून १४७ बळी देखील घेतले आहेत.

दीप्तीच्या नावावर ‘हा’ विक्रम जमा

दीप्ती केवळ महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सची कर्णधार नाही तर ‘बीबीएल’ आणि ‘द हंड्रेड’ मध्ये देखील खेळत असते. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक वैयक्तिक खेळी खेळण्याचा विक्रम देखील दीप्ती शर्माच्या नावावर जमा आहे.

२०१७ मध्ये, तिने आयर्लंडविरुद्ध खेळताना १८८ धावांची खेळी साकारली होती.  एकदिवसीय सामन्यांमध्ये वैयक्तिक सर्वात मोठी खेळी आहे. तसेच गोलंदाजीमध्ये दीप्ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी देखील केली आहे.  २०१६ मध्ये, तिने श्रीलंकेविरुद्ध २० धावा देऊन ६ बळी घेतले आहेत.

हेही वाचा : Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

उत्तर प्रदेशकडून डीएसपी पदावर नियुक्ती

दीप्ती शर्माने कसोटी क्रिकेटमध्येही मोठी कामगिरी केली आहे. तिने कसोटीमध्ये सलग चार अर्धशतके झळकावली आहेत. ती भारतासाठी सर्वाधिक ९१ टी-२० सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दीप्ती दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तिच्या कामगिरीमुळे उत्तर प्रदेश सरकारने जानेवारी २०२५ मध्ये तिला डीएसपी पदावर नियुक्त केले आहे.

Web Title: Indian womens teams deepti sharma celebrates her 28th birthday today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Deepti Sharma

संबंधित बातम्या

IND vs ENG : महिला क्रिकेटची ऋषभ पंत! एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, गोलंदाजही थक्क
1

IND vs ENG : महिला क्रिकेटची ऋषभ पंत! एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, गोलंदाजही थक्क

 IND w Vs END w : ‘दबाव हाताळायला धोनी सरांकडून शिकले..’, ३०० विकेट्स पूर्ण करणाऱ्या दीप्ती शर्माने केला मोठा खुलासा
2

 IND w Vs END w : ‘दबाव हाताळायला धोनी सरांकडून शिकले..’, ३०० विकेट्स पूर्ण करणाऱ्या दीप्ती शर्माने केला मोठा खुलासा

टीम इंडियाच्या खेळाडूची 25 लाख रुपयांची फसवणूक, सहकारी खेळाडूवर केला आरोप, गुन्हा दाखल
3

टीम इंडियाच्या खेळाडूची 25 लाख रुपयांची फसवणूक, सहकारी खेळाडूवर केला आरोप, गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.