फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप समारंभ ११ ऑगस्ट रोजी पार पडला. आता लवकरच पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार आहे. यंदा भारताचे पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. यासाठी पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात ध्वजवाहकाची विशेष भूमिका असते. उद्घाटन सोहळ्याला सहभागी झालेल्या देशामधील खेळाडू हे त्यांचे ध्वज फडकवतात. त्यामुळे हा विशेष खेळाडूंना त्यांचे सरकार मान देत असते. यंदा भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ध्वजवाहक पीव्ही सिंधू आणि शरथ कमल यांना हा मान देण्यात आला होता. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे ध्वजवाहक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुमित आंतील आणि भाग्यश्री जाधव हे असणार आहेत.
🇮🇳✨ India announces flag bearers for Paris Paralympics 2024! 🏋️♀️
Shot putter Bhagyashree Jadhav and javelin thrower Sumit Antil to lead the largest-ever Indian contingent with pride! 🇫🇷💪#ParisParalympics pic.twitter.com/HVScAlUzdn
— Khel Now (@KhelNow) August 16, 2024
पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (PCI) ने सांगितले की, यावेळी भारत पॅरा सायकलिंग, पॅरा रोइंग आणि ब्लाइंड ज्युदो या तीन नवीन स्पर्धांमध्येही सहभागी होत आहे. या तीन खेळांसह भारत पॅरालिम्पिकमध्ये एकूण १२ खेळांमध्ये आव्हान सादर करणार आहे. महाराष्ट्राच्या भाग्यश्रीने २०२२ आशियाई पॅरा गेम्समध्ये शॉटपुट F34 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सातवे स्थान पटकावले होते.
भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित आंतीलने आंतरराष्ट्रीय स्तरावर अविश्वसनीय कामगिरी केली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये त्याने ६९.५० मीटर भालाफेकून गोल्ड मेडल नावावर केले होते त्याचबरोबर त्याने वर्ल्ड रेकॉर्ड देखील मोडला होता. त्यामुळे यंदा त्याच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा भारतीयांना आहे. यंदा भारताचे ८४ खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी सुमित आंतील म्हणाला की, २५ हून अधिक पदकांची या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अपेक्षा असणार आहे.