IPL 2025: Invitation to the heads of all three teams for the final match of IPL! BCCI has taken a decision..
IPL 2025 : आयपीएल २०२५ शेवटच्या टप्प्यात आले आहे. आतापर्यंत ७० सामने खेळवण्यात आले आहेत. आता क्वालिफायर सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी सांगितले की त्यांनी ३ जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यासाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या ‘वीर प्रयत्नांना’ स्पर्धेच्या समारोप समारंभात सलाम केला जाईल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एका माध्यम निवेदनात ही घोषणा केली.
सैकिया यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले की, आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी अहमदाबाद येथे होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी सर्व भारतीय सशस्त्र दलांच्या प्रमुखांना, उच्च अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना आमंत्रित केले आहे. सैकिया म्हणाले की, बीसीसीआय देशाच्या सशस्त्र दलांच्या ‘शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला’ सलाम करते. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर अंतर्गत वीर प्रयत्नांचे’ कौतुक केले ज्याने राष्ट्राचे रक्षण केले आणि प्रेरणा दिली.
सायकिया म्हणाले की, त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून, आम्ही समारोप समारंभ सशस्त्र दलांना समर्पित करण्याचा आणि आमच्या वीरांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट हा राष्ट्रीय ध्यास असला तरी, आपल्या देशापेक्षा आणि त्याच्या सार्वभौमत्वापेक्षा, अखंडतेपेक्षा आणि सुरक्षिततेपेक्षा काहीही मोठे नाही. जनरल उपेंद्र द्विवेदी हे लष्करप्रमुख आहेत. तर अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे नौदलप्रमुख आहेत. एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग हे हवाई दल प्रमुख आहेत.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी २६ जणांना ठार मारल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक पर्यटक होते. प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये थोडक्यात लष्करी संघर्ष झाला आणि त्यानंतर पाकिस्तानने युद्धबंदीच्या विनंतीवरून भारताने आपले ऑपरेशन थांबवण्यास सहमती दर्शविली.
आयपीएल 2025 च्या ७० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुकडून ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्मा(३३ चेंडूत ८५ धावा) आणि विराट कोहलीच्या (३० चेंडूत ५४ धावा) अर्धशतकांच्या जोरावर २३० धावांचे लक्ष्य १९ व्या षटकातच पूर्ण केले. या विजयासह बंगरूळुने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला.