ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
RCB Vs LSG : आयपीएल 2025 च्या स्टेज लीगचा शेवटचा सामना काल एकाना स्टेडियमवर खेळवण्यात आला. या ७० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने ६ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्माने तुफानी खेळीच्या जोरावर १९ व्या षटकातच विजय खेचून आणला.या विजयाने बंगरूळु क्वालिफायर १ मध्ये प्रवेश निश्चित केला. लखनौसाठी या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतने विक्रमी वादळी शतक ठोकले. या शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्स संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता.
लखनौ सुपर जायंट्स या हंगामात पंतची कामगिरी खूपच खराब राहिली. परंतु, आरसीबीविरुद्ध लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात त्याने स्फोटक शतक ठोकून टीकाकारांची तोंड बंद केली. त्याने आरसीबीविरुद्ध ५४ चेंडूत शतक ठोकले. या खेळीत तो ११८ धावांवर नाबाद राहिला.
ऋषभ पंत आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हेनरिक क्लासेन यांच्या नावावर होता. त्याने या वर्षी शतक झळकावले आहे. हैदराबादने त्याला २३ कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. हा विक्रम आता पंतने मोडीत काढला आहे. आरसीबीविरुद्ध ११८ धावांची खेळी खेळून, ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासात शतक झळकावणारा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. या वर्षी एलएसजी फ्रँचायझीने त्याला २७ कोटी रुपये देऊन खरेदी केले.
कर्णधार ऋषभ पंत व्यतिरिक्त, सलामीवीर मिचेल मार्शने देखील या सामन्यात स्फोटक अर्धशतक झळकावले. त्याने आरसीबीविरुद्ध ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या विकेटनंतर, या दोन्ही फलंदाजांनी लखनौचा डाव खूप चांगल्या प्रकारे हाताळला. परंतु बंगरूळुच्या जितेन शर्माने लखनौकडून हा विजय खेचून आणला. त्याने ३३ चेंडूत ८५ धावा करत संघाला विजय मिळवला.
हेही वाचा : Asian Athletics : स्पर्धेत भारताची पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी; Gulveer Singh ने केली सोनेरी कामगिरी…
लखनऊ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रिट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, विल्यम ओ’रोर्क.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिलिप साल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक/कर्णधार), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा.