IPL 2025: 'But BCCI has no respect for him..' Serious criticism from female cricketer on the board, read what is the matter?
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत ६९ सामने खेळवण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. क्रिकेट जगतात बीसीसीआयचाच शब्द अंतिम मानला जातो. म्हणूनच भारतीय क्रिकेट बोर्डाकडे सगळेजण आदर आणि सन्माने बघत असतात. दरम्यान, महिला क्रिकेटपटूने बीसीसीआयवर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करून बोर्डाच्या कारभरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
सध्या आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू आहे. या काळात बीसीसीआयकडून धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी, असा एक खेळाडू आहे जो प्रत्येक हंगामात आयपीएलमध्ये खेळत आला आहे. परंतु त्याला बीसीसीआयने अद्याप सन्मानित केलेले नाही. म्हणूनच महिला क्रिकेटपटूने बीसीसीआयला खडसावले आहे.
हेही वाचा : IPL 2025 : ‘मला टी-२० संघात परतायचे आहे आणि माझ्या…’, KL Rahul ने स्पष्ट केले भविष्यातील मनसुबे..
भारतीय संघाची महिला क्रिकेटपटू भारती फूलमाळीकडून बीसीसीआयवर भेदभावाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हे आरोप केले आहेत. आता भारी फूलमाळीची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने केकेआरचा फलंदाज मनीष पांडेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.
मनीष पांडे हा आयपीएलचा भाग आहे. महिला क्रिकेटपटू भारती फूलमाळीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “मनीष पांडे गेल्या १८ वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. पण बीसीसीआयने त्याला कोणताही आदर दिला नाही कारण त्याच्याकडे पीआर नाही आणि मोठा चाहता वर्ग नाही. पण जर देवाने त्याला आणखी एक संधी दिली असती तर तो स्वतःला सिद्ध करू शकला असता.” असे फूलमाळीने लिहिले आहे.
भारती फूलमाळीने त्याच्या पोस्टमध्ये मनीष पांडेचे कौतुक केले आहे. तिने लिहिले आहे की, त्यांचा खेळ पाहणे हा केवळ क्रिकेट नाही तर कलेचा अनुभव आहे. तसेच ती म्हणाली की, आयपीएल २०२५ हा त्याचा या हंगामातील १८ वा हंगाम आहे. मनीष पांडेने चालू हंगामात ३ डावात ९२ धावा केल्या आहेत. पांडेने मुंबईविरुद्ध १९, चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाबाद ३६ आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३७ धावा केल्या आहेत.