के एल राहुल(फोटो-सोशल मिडिया)
KL Rahul : भारतात सद्या आयपीएल सुरू असून आयपीएलचा १८ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये केएल राहुल हा सद्या चांगल्या फॉर्ममधून जात आहे. केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्याने १३ सामन्यांमध्ये ५३.९० च्या सरासरीने ५३९ धावा करून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातवे स्थान पटकावले आहे. यामध्ये त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.
त्याच्या आयपीएलच्या कामगिरीने राहुलला आत्मविश्वास मिळाला आहे. जो त्याने केलेल्या विधानातून दिसून येत आहे. राहुलने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केएलने भारतासाठी शेवटचा टी-२० सामना २०२२ च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना केएल म्हणाला की, ‘हो, मला भारतीय टी-२० संघात परतायचे आहे. माझ्या मनामध्ये विश्वचषक आहे. पण सध्या मी ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे त्याचा आनंद घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. राहुलने या अनुभवी फलंदाजाने टी-२० च्या विकास करण्याची कबुली देऊन खेळाच्या गरजांशी जुळवून घेण्याची गरज देखील बोलून दाखवली आहे.
राहुल पुढे म्हणाला की, ‘मला व्हाईट-बॉल फॉरमॅटबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळदेखील मिळाला आहे.’ मी कुठे देखील असलो तरी, माझ्या कामगिरीवर मी खूप आनंदी होत असतो. पण सुमारे १५-१२ महिन्यांपूर्वी, मला वाटत होते की, हे स्वरूप जास्तच पुढे जायला लागले आहे. ते बदलत आहे किंवा वेगाने होत असल्याचे देखील राहुलने म्हटले आहे. तसेच त्याने आधुनिक क्रिकेटमध्ये चौकार मारण्याचे महत्त्वही स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंड दौऱ्यावर भारतासाठी पदार्पण करू शकतात हे ३ खेळाडू
केएल राहुल पुढे म्हणाला की, ‘हे कमी चौकार मारणाऱ्या संघाच्या तुलनेत जिंकणाऱ्या एकूण संघाबद्दल बोईलत आहे. आजकाल कमी चौकार मारणाऱ्या संघांना पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. तो म्हणाला, आता टी-२० क्रिकेट या पातळीवर जाऊन पोहोचले आहे की, मी गेल्या काही वर्षांपासून टी-२० संघाचा भाग राहिलेलो नाही. यामुळे मला या फॉरमॅटबद्दल विचार करण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. असे देखील राहुलने स्पष्ट केले आहे.
आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा पराभव केला. या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवुन दिला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने संथ गतीने फलंदाजी केल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला. पंजाबणने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 20 ओवर मध्ये १८४ धावा केल्या होत्या. पंजाबने हे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून विजय मिळवला.






