IPL 2025: Do you know 'these' batsmen who scored the youngest century in IPL history? Find out..
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. या हंगामातील पहिला सामना हा गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवला जाणारा आहे. तर इंडियन प्रीमियर लीग 2025 चा शेवटचा सामना 25 मे रोजी होणार आहे. 10 संघांच्या उपस्थितीत खेळवली जाणारी आयपीएलची 18 वी आवृत्ती खूपच रोमांचक होणार आहे. यासाठी, सर्व संघ त्यांच्या तयारीत व्यग्र असून त्यांच्या सर्वोत्तम खेळलेल्या 11 चा शोध घेत आहेत.
आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. या मालिकेत आता आम्ही तुम्हाला आयपीएलच्या इतिहासातील त्या 5 फलंदाजांची यादी सांगणार आहोत, ज्यांनी या लीगदरम्यान सर्वात कमी वयात शतक ठोकले आहे.
मनीष पांडे हा आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू आहे. त्याने वयाच्या 19 वर्षे 253 दिवसांत आयपीएलमध्ये शतक लागवले होते. 2009 च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर संघाविरुद्ध त्याने हे शतक झळकावले होते. त्या सामन्यात मनीष पांडेने 73 चेंडूत 114 धावा चोपल्या होत्या.
या यादीत तारांकित यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने वयाच्या 20 वर्षे 218 दिवसात आयपीएलमधील पहिले शतक झळकावले आहे. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर त्याने हे शतक केले. त्यावेळी तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. त्या दिवशी पंतने तूफान फटकेबाजी करत 63 चेंडूत 128 धावा केल्या होत्या.
या यादीमध्ये आश्वासक युवा यष्टिरक्षक फलंदाज देवदत्त पडिकलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. पडिक्कलने वयाच्या 20 वर्षे 289 दिवसांत आयपीएलमधील पहिले शतक ठोकले होते.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालचा चौथ्या स्थानावर समावेश होतो. त्याने वयाच्या 21 वर्षे 123 दिवसांत शतक झळकावले. त्याचे वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ईडन गार्डनवर घुमणार ‘हा’ आवाज; ‘हे’ बॉलीवूड स्टार्स लावणार चार चांद..
आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण फलंदाजांच्या यादीत संजू सॅमसन हा पाचव्या स्थानावर आहे. वयाच्या 22 वर्षे 141 दिवसात त्याने ही कामगिरी करून दाखवली होती. सध्या संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना त्याने शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने एकूण 102 धावा केल्या होत्या.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.