
IPL 2026 Retention Live Update: Chennai releases 9 players! Whom did Delhi and other teams release, who did they give entry to?
IPL 2026 Retention Live Update : आयपीएल २०२६ रिटेन्शन डेडलाइनच्या आधी अनेक प्रमुख व्यवहार आधीच जाहीर केले गेले आहेत. ज्यामुळे आयपीएल २०२६ चा पुढील हंगाम आणखी रोमांचक असणार आहे. शनिवारी लीगने रवींद्र जडेजा, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमीसह आठ खेळाडूंच्या व्यवहारांची अधिकृतपणे पुष्टी केली, ज्यामुळे सर्वांचे लक्ष आता रिटेन्शन यादीवर केंद्रित झाले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मिनी-लिलावापूर्वी, सर्व फ्रँचायझी त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या यादीतून कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना रिटेन्शन करत आहेत आणि कोणती मोठी नावे रिलीज करण्यात आली आहेत. याबबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : महिला क्रिकेटसाठी नव्या पर्वाची नांदी! Women Cricket World Cup विजयानंतर केंद्रीय करारांमध्ये होणार सुधारणा
आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावापूर्वी पंजाब किंग्ज संघाने ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, प्रवीण दुबे, कुलदीप सेन आणि काइल जेमिसन यांना त्यांच्या संघातून सोडण्यात आले आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने त्यांच्या संघातून वनिंदू हसरंगा, अशोक शर्मा, कुमार कार्तिकेय, आकाश माधवाल, महेश थिकेशना आणि फजलहक फारुकी या खेळाडूंना सोडले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने मिनी-लिलाव होण्यापूर्वी आंद्रे सिद्धार्थ, राहुल त्रिपाठी, वंश बेदी, शेख रशीद, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, डेव्हॉन कॉनवे, कमलेश नागरकोटी, रचीन रवींद्र आणि मथिशा पाथिराणा यांच्यासह अनेक खेळाडूंना रिलीज केले आहे.
पंजाब किंग्ज संघाने ग्लेन मॅक्सवेल या स्फोटक खेळाडूला सोडले आहे. संघाने जोश इंग्लिससह एकूण सहा खेळाडूंना सोडले आहे.
आयपीएल २०२५ चे जेतेपद विजेता संघ आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोन आणि लुंगी एनगिडी यांना रिलीज केले आहे. संघ आता लिलावात १६.४ कोटी रुपयांच्या रकमेसह सहभागी होणार आहे.
मुंबई इंडियन्सकडून मुजीब उर रहमान आणि रीस टोपलीसह नऊ खेळाडूंना सोडण्यात आले. चेन्नईसोबत ट्रेड करून शार्दुल ठाकूर आता एमआयमध्ये सामील झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला सोडत सर्वांना धक्का दिला आहे. केकेआरने क्विंटन डी कॉकला देखील संघातून वगळले आहे.
हेही वाचा : IND vs SA 1st Test : KL Rahul ने गाठला मोठा टप्पा! भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा केल्या पूर्ण