केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
KL Rahul completes 4000 Test runs : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. यासह, केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा गाठला आहे. केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ही कामगिरी केली आहे.
केएल राहुलने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत ११ शतके आणि २० अर्धशतके झळकावली असून केएल राहुल भारताचा एक भावरशाचा फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा करणारा तो १८ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांच्या ३२९ डावात ५३.७८ च्या सरासरीने १५,९२१ धावा फटकावल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा गाठणारा तेंडुलकर हा जगातील एकमेव खेळाडू आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील मालिकेतील पहिल्या सामन्याबाबत, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत फक्त 159 धावा केल्या. भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. भारताकडून जसप्रीत बूमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या अहते.
दक्षिण आफ्रिकेच्या या डावात दक्षिण आफ्रिकेकडून मार्करामने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर मुल्डर आणि झोर्झी २४ धावांवर बाद झाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने २७ धावांत ५ बळीन टिपले तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
हेही वाचा: ‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
भारतीय संघ १८९ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ३० धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ३९ धावा केल्या आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जेडेजाने खास कामगिरी केली आहे. जगातील नंबर १ कसोटी अष्टपैलू खेळाडूने १५ नोव्हेंबर रोजी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० धावा आणि किमान ३०० विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा जडेजा दुसरा भारतीय आणि जगातील एकमेव चौथा क्रिकेटपटू बनला आहे.






