Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टी-२० क्रिकेटमध्ये जोस बटलरचे वादळ! ‘किंग’ कोहली आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ गेलच्या खास पंक्तीत झाला सामील..

इंग्लंड संघाचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरने आपल्या टी-२० कारकिर्दीमध्ये एक मोठा पराक्रम केला आहे. या कामगिरीने त्याने आता विराट कोहली आणि क्रिस गेलच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 18, 2025 | 03:32 PM
Jos Buttler's storm in T20 cricket! He joins the special ranks of 'King' Kohli and 'Universal Boss' Gayle..

Jos Buttler's storm in T20 cricket! He joins the special ranks of 'King' Kohli and 'Universal Boss' Gayle..

Follow Us
Close
Follow Us:

Jos Buttler hits 13,000 runners-up mark : सध्या इंग्लंडमध्ये देशांतर्गत टी-२० स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दरम्यान, इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जोस बटलरने त्याच्या टी-२० कारकिर्दीमध्ये एक मोठा कारनामा केला आहे. १७ जुलै रोजी यॉर्कशायरविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने मोठी कामगिरी केली आहे. या दरम्यान, बटलरने आपल्या बॅटने वादळ निर्माण केल्याचे दिसून आले आहे.

इंग्लंड संघाचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने यॉर्कशायर संघाविरुद्ध ७७ धावांची धामकेदार खेळी साकारली आहे. या खेळीच्या जोरावर त्याने टी-२० मध्ये एक मोठा मैलाचा दगड पार केला आहे. आता बटलर हा टी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच वेळी, जागतिक क्रिकेटबद्दल सांगायचे झाले तर, या यादीत तो विराट कोहली आणि महान कॅरिबियन फलंदाज क्रिस गेल यांच्या यादीत ७ व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे.

हेही वाचा : IND vs ENG : नायरसाठी भारतीय संघ शेवटचाच ‘करूण’ होणार? मँचेस्टर कसोटीसाठी संघात ‘या’ एकमेव बदलाची शक्यता

जोस बटलरने गाठला १३ हजार धावांचा टप्पा

यॉर्कशायरविरुद्ध जोस बटलरने ७७ धावांची खेळी कलेची. त्यांनतर तो भारताच्या स्टार फलंदाज किंग विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या १३००० धावांच्या क्लबमध्ये जाऊन सामील झाला आहे. टी२० ब्लास्टमध्ये त्याने यॉर्कशायरविरुद्ध ४६ चेंडूत ७७ धावा फटकावल्या आहेत. त्याच्या खेळीत एकूण ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. बटलरच्या या धमाकेदार खेळीमुळे संघाने विजय देखील प्राप्त केला आहे.

लँकेशायरच्या संघाने १९.५ षटकांत एकूण १७४ धावा केल्या होत्या. बटलर या संघाचा महत्चाचा खेळाडू आहे. दुसरीकडे, यॉर्कशायरचा संघ १५३ धावांमध्ये गारद झाला आहे. या सामन्यात बटलरच्या संघाने २१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह, बटलरने विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या यादी देखील यावेळी प्रवेश केला आहे. जोस बटलरने त्याच्या ४५७ व्या टी२० सामन्यात १३००० धावांचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा : IND vs ENG सामन्यादरम्यान केलेल्या वर्तनावर आयसीसीने भारतीय फलंदाज आणि इंग्लंड संघाला ठोठावला दंड

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. ख्रिस गेल- १४५६२ धावा
  2. किरोन पोलार्ड- १३८५४ धावा
  3. अ‍ॅलेक्स हेल्स- १३८१४ धावा
  4. शोएब मलिक- १३५७१ धावा
  5. विराट कोहली- १३५४३ धावा
  6. डेव्हिड वॉर्नर- १३३९५ धावा
  7. जोस बटलर- १३०४६ धावा

इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर हा टी-२० फॉरमॅटमध्ये एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो. म्हणूनच तो सतत जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीग आयपीएलमध्ये खेळताना दिसून येतो. सध्या तो गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. बटलरने एकूण ४५७ टी-२० सामने खेळले असून यामध्ये त्याने ३५.७४ च्या सरासरीने एकूण १३०४६ धावा फटकावल्या आहेत. या काळात बटलरने एकूण ८ शतके आणि ९३ अर्धशतकीय डाव खेळले आहेत.

Web Title: Jos buttlers storm in t20 cricket he joined the special ranks of kohli and gayle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 03:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.