Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs NZ : Kane Williamson ने घातला धावांचा रतीब; केला ‘हा’ रेकॉर्ड, असं करणारा न्यूझीलंडचा ठरला पहिलाच खेळाडू.. 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा  दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात केन विल्यमसनने मोठा भीम पराक्रम केला आहे. त्याने 27 धावा पूर्ण करत 19 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असे करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 05, 2025 | 08:28 PM
SA vs NZ: Kane Williamson scores runs; sets 'this' record, becomes the first New Zealand player to do so.

SA vs NZ: Kane Williamson scores runs; sets 'this' record, becomes the first New Zealand player to do so.

Follow Us
Close
Follow Us:

SA vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा  दुसऱ्या सेमी फायनल सामना आज (5 मार्च) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत 6 गडी गमावून 362  धावा केल्या आहेत.  यामध्ये रचीन रवींद्रसह केन विल्यमसनने शतके ठोकली आहेत.  केन विल्यमसनने 102 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केन विल्यमसनने ही कामगिरी केली आहे.

लाहोर मधील गद्दाफी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात विल्यमसनला 27 धावांची गरज होती आणि केशव महाराजने टाकलेल्या सामन्याच्या 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत त्याने हा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विल्यमसन हा क्रिकेट जगातील 16 वा फलंदाज ठरला आहे. केन विल्यमसनने आपल्या 384व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि 440व्या डावात 19 हजार धावांचा आकडा गाठला आहे.

न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

केन विल्यमसन :  19,000*
रॉस टेलर : 18,199
स्टीफन फ्लेमिंग :  15,289 
ब्रेंडन मॅक्युलम :14,676
मार्टिन गुप्टिल : 13,463

सर्वात जलद 19 हजार धावा करणारे फलंदाज

विराट कोहली (भारत) : 399 डाव
सचिन तेंडुलकर (भारत) :432 डाव
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) : 433डाव
केन विल्यमसन (न्यूझीलंड) : 440 डाव
जो रूट (इंग्लंड) : 444 डाव
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) : 444 डाव

भारताचा विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 19 हजार धावा करणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या 399 व्या डावात ही कामगिरी करून दाखवली आहे.  या यादीत कोहलीनंतर सचिन तेंडुलकर (432 डाव) आणि वेस्ट इंडिजचा महान ब्रायन लारा (433) यांचा नंबर येतो.  इंग्लंडचा जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग यांनी 444 व्या डावात 19 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

संघांचे प्लेइंग-11 पहा

दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग इलेव्हन

रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, केशवजी महाराज, एन.

न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (क), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विलियम ओ’.

भारताची फायनलमध्ये धडक..

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 मार्चला  सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय प्राप्त केला आहे.  या विजयाने भारत थेट फायनलमध्ये पोहचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. विराट कोहलीने केलेली 84 धावांची खेळी महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताला 265 धावांचे लक्ष्य दिले होते.

 

 

Web Title: Kane williamson has created a big record in icc champion trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 07:05 PM

Topics:  

  • kane williamson
  • New Zealand

संबंधित बातम्या

न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! किवी स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती
1

न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! किवी स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती

IPL 2025 दरम्यान जाहीर झाला सेंट्रल काॅन्ट्रक्ट, या खेळाडूंना मिळाला जॅकपॉट
2

IPL 2025 दरम्यान जाहीर झाला सेंट्रल काॅन्ट्रक्ट, या खेळाडूंना मिळाला जॅकपॉट

न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचे थैमान; देशात आणीबाणी लागू
3

न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचे थैमान; देशात आणीबाणी लागू

IPL 2025 : हरभजनच्या शाळेत विलियम्सनची भरती! हिंदी ऐकून ‘गुरू’ भज्जी लोटपोट, Hi मैं केन मामा…, Video Viral
4

IPL 2025 : हरभजनच्या शाळेत विलियम्सनची भरती! हिंदी ऐकून ‘गुरू’ भज्जी लोटपोट, Hi मैं केन मामा…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.