SRH vs GT: Kavya Maran's anger at Abhishek Sharma in the live match! She gave such a reaction, everyone was shocked, Video Viral
SRH vs GT : आयपीएल 2025 चा 18 चा हंगाम जोरात असून गुणतालिकेत देखील मोठे चढउतार दिसू लागले आहेत. काल (6 एप्रिल) झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने हैद्राबदाचा पराभव केला. सामन्यापूर्वी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर हैद्राबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करत हैद्राबाद संघ 152 धावाच करू शकला. प्रतिउत्तरात जीटी संघाने हे लक्ष्य 16.4 ओव्हरमध्येच पूर्ण केले. या सामन्यात जीटी संघातील गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजांनी केली. या सामन्यादरम्यान एक घटना घडली. यामध्ये हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनचा वाढलेला रंग दिसून अलअ.
झाले असे की, काव्या मारन तिच्या सीटवर बसून होती. आपल्या जागेवरूनच तिने आपला राग काढला. सरम्यान हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हैद्राबादला प्रथम फलंदाजी करताना संघाला फक्त 53 धावांच करता आल्या. हे लक्ष्य जीटीने सहज पूर्ण केले. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी हैदराबाद संघाने भारतीय फलंदाज अभिषेक शर्माला 14 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवून घतले होते.
हेही वाचा : IPL 2025 : तो मैदानात परतला! जसप्रीत बुमराहने पहिले सराव सत्र गाजवले, फलंदाजांची उडाली भंबेरी; पहा Video
परंतु, या डावखुऱ्या फलंदाजाने आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली ज्याचा फटका संघाला बसत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने केवळ 24 धावा केल्या आणि त्यानंतर सलग तीन सामन्यात त्याला दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. गेल्या तीन सामन्यात केवळ 6, 1 आणि 2 धावा करून अभिषेक लवकर तंबूत परतला. कालच्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा गुजरातविरुद्ध 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर झाल्यावर काव्याने प्रतिक्रिया दिली जी पाहण्यासारखी होती.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) April 6, 2025
अभिषेकने गुजरातविरुद्ध चांगली सुरुवात करून देखील त्याला मैदानात तग धरता आला नाही आणि तो आपली विकेट स्वस्तात देऊन बसला. हैदराबादची मालकीण काव्याला हे अजिबात रुचले नाही आणि ती खूप संतप्त दिसून आली. ती स्टेडियममध्ये बसून तिने याबाबत आपली नाराजी व्यक्त करताना दिसली. मोहम्मद सिराजविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या नादात अभिषेकने ज्या प्रकारे सोपा झेल दिला, तो काव्याला आवडला नसल्याचे दिसले. एका चाहत्याने त्याच्या X हॅंडलवर त्याच्या नाराजीचा एक व्हिडिओ शेअर केला. तो सध्या खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा : SRH vs GT : जीटीची ‘Mohammad Siraj एक्सप्रेस’ जोरात! आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांना ओव्हरटेक करत रचला विक्रम..
गुजरात टायटन्स संघ : इशान किशन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी.
सनरायझर्स हैदराबाद संघ : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, रवी श्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा.