Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs KKR : IPL 2025 मध्ये केकेआरचा खेळाडू करत होता फसवणूक, पंचांचं लक्ष गेलं अन् रंगेहात.. 

काल मंगळवार रोजी(१५ एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या एका खेळाडूसोबत अशी घटना घडल्याचे समोर आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 16, 2025 | 02:50 PM
PBKS vs KKR: KKR player was cheating in IPL 2025, umpires noticed and caught red-handed..

PBKS vs KKR: KKR player was cheating in IPL 2025, umpires noticed and caught red-handed..

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs KKR : आयपीएल २०२५ मध्ये ३१ सामने खेळले गेले आहेत. काल मंगळवार रोजी(१५ एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.  पंजाब किंग्जने हा रोमांचक सामना १६ धावांनी आपल्या नावे केला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद केवळ १११ धावा केल्या. केकेआरच्या गोलंदाजासमोर पंजाबचे फलंदाज काही करू शकले नाही. तसेच पंजाबच्या गोलंदाजांनी देखील पलटवार करुन केकेआरच्या संघाला ९५ धावांवरच रोखले. सामन्यादरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सच्या एका खेळाडूसोबत अशी घटना घडल्याचे समोर आले आहे.  त्यानंतर त्याला त्याची बॅट बदलून घ्यावी लागली.  दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अँरिच नोर्कियाला पंजाब किंग्जविरुद्ध आपली बॅट बदलावी लागली. त्यानंतरच त्याला पंचाकडून फलंदाजीची परवानगी देण्यात आली.

अँरिक नोर्कियाच्या बॅटची रुंदी जास्त भरल्याने तो बॅट मापन चाचणीत नापास झाला. मैदानावरील पंचांकडून त्याला त्याची बॅट बदलण्यास सांगण्यात आले. केकेआरच्या डावाच्या १६ व्या षटकाच्या सुरुवातीला ही घटना घडली होती. यानंतर अँरिक नोर्किया लगेच बॅट बदलली. या घटनेबद्दल, टीव्ही समालोचकांनी सांगितले की बॅट निश्चित नियमांपेक्षा वेगळी असल्याने ती बदलावी लागली.

हेही वाचा : LA Olympics २०२८ : १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन, अमेरिकेत होणार आयोजन, जय शाहांची घोषणा..

नियम काय सांगतो?

यापूर्वी आयपीएलमध्ये, बॅटची जाडी आणि रुंदी ड्रेसिंग रूममध्येच मोजली जात होती. नियमांनुसार, बॅटची रुंदी १०.७९ सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. बॅटची जाडी ६.७ सेमी पेक्षा जास्त आणि कडाची रुंदी ४ सेमी पेक्षा जास्त नसावी. बॅटची लांबी ९६.४ सेंटीमीटरपर्यंत पोहोचू शकते. असे नियम आहेत.

खेळ समान ठेवण्याचा प्रयत्न

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी बॅटच्या तपासणीच्या अहवालात सांगितले की, कोणीही अन्याय्य फायदा घेत आहे, असे कोणालाही वाटू नये. बीसीसीआय आणि आयपीएल नेहमीच खेळात समानता राखण्यासाठी प्रयत्नशील असते. सर्व निर्णय पुनरावलोकन करण्यायोग्य असावेत आणि खेळावर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करतो. यामागील कल्पना म्हणजे खिलाडूवृत्तीची भावना जिवंत ठेवणे ही आहे.

हेही वाचा : DC vs RR : दिल्ली आपले तख्त रखण्यास उत्सुक, तर राजस्थान रॉयल्स करेल गर्जना, वाचा आजच्या सामन्याची A टू Z माहिती..

नारखियाने आयपीएल २०२५ मध्ये खेळला पहिला सामना

कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज अँरिक नोर्कियाने आयपीएल २०२५ मध्ये त्याचा पहिला सामना खेळला आहे. तो बऱ्याच काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. मात्र, आता तो पुन्हा मैदानात उतरला आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात नोर्कियाने ३ षटके टाकली असून त्याने २३ धावा देऊन १ गडी बाद केला.

Web Title: Kkr player was cheating in ipl 2025 umpires caught him pbks vs kkr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • PBKS vs KKR

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.