अक्षर पटेल आणि संजू सॅमसन(फोटो-सोशल मिडिया)
DC vs RR : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगामाचा थरार चांगलाचा रंगात आला. गुणतलिकेत देखील चढउतार होत असल्याचे बघायला मिळत आहे. आयपीएल २०२५ मध्ये आजवर ३१ सामने खेळण्यात आले आहेत. ३२ वा सामना आज १६ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात येईल. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. दिल्लीला या मैदानावर शेवटच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच राजस्थान संघही शेवटचा सामना गमावल्यानंतर आज मैदानात उतरणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या ४ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ दोन विजयांसह आठव्या स्थानावर विराजमान आहे. राजस्थान हा सामना जिंकून त्यांच्या पॉइंट टेबलमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असेल.
हेही वाचा : IPL 2025 वर काळे सावट, एक जण साधतोय खेळाडूंशी जवळीक, भ्रष्टाचार विरोधी पथक सक्रिय, BCCI ने दिला इशारा..
अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना पोषक असे काही नाही. ही एक सपाट खेळपट्टी मानली जाते, जी फलंदाजांना खोऱ्याने धावा करण्यासाथी मोठी मदत करते. मैदानाचे क्षेत्रफळ कमी असल्याने, सीमा ओलांडणे अधिक सोपे जाते. जरी नंतरच्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांना थोडीशी साथ मिळत असली तरी, एकंदरीत ही खेळपट्टी फलंदाजीसाठी फायद्याची आहे.
बुधवारी संध्याकाळी दिल्लीत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान सुमारे ३६°C असणार आहे. आर्द्रता सुमारे ३९% असू शकते. पावसाची मात्र कोणतीही शक्यता नाही.
दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे २९ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी राजस्थानने १५ सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने १४ सामने आपल्या नावे केले आहेत. या आकड्याशी बरोबरी करण्यासाठी दिल्लीला फक्त एका विजयाची गरज आहे. २०२२ पासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या ९ सामन्यांमध्ये दिल्लीने आपला वरचष्मा दाखवत ६ आणि राजस्थानने ३ सामन्यात विजय मिळवला आहे.
हेही वाचा : LA Olympics २०२८ : १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन, अमेरिकेत होणार आयोजन, जय शाहांची घोषणा..
दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य प्लेइंग ११ : करुण नायर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स,अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा
राजस्थान रॉयल्स संभाव्य खेळी ११ : संजू सॅमसन (कर्णधार, यष्टिरक्षक), शस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे