मुंबई : कतार येथे सुरु असलेलया फिफा विश्वचषक स्पर्धेतील (FIFA World Cup) अंतिम सामान १८ डिसेंबर रोजी रंगणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत रंगणार असून विजेता संघ फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरणार आहे. विश्वविजेत्या संघाला ही चमचमती ट्रॉफी मिळणार असून या ट्रॉफीचे क्रेझ अवघ्या फुटबॉल विश्वावर आहे. मात्र फिफा विश्वचषकाची ही ट्रॉफी इतकी खास का असते? याबद्दल काही इंट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेऊयात.
फिफा विश्वचषक ट्रॉफी ही जगातील सर्वात महागडी क्रीडा ट्रॉफी आहे. या ट्रॉफीची एकूण किंमत सुमारे १४४ कोटी रुपये इतकी आहे. जेव्हा फिफा विश्वचषक तयार करण्यात आला तेव्हा त्याची किंमत $५०,००० होती, परंतु आता त्याची किंमत अंदाजे १४४ कोटी रुपये आहे. फिफा विश्वचषकात देण्यात आलेल्या ट्रॉफीबद्दल सांगायचे तर त्याची रचना प्रसिद्ध इटालियन कारागीर सिल्व्हियो गझानिगा यांनी बनवली होती. हा विश्वचषक ३७ सेंटीमीटर (१४ इंच) पेक्षा कमी उंचीचा असून यात दोन मानवी आकृत्या एका ग्लोबला धरून ठेवल्या आहेत. या ट्रॉफीचे एकूण वजन ६. १७५ किलो आहे.
फिफा विश्वचषक ट्रॉफीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रॉफी १८ कॅरेट सोन्याची बनलेली आहे आणि याचे वजन सुमारे 6 किलो (13 पौंड) आहे. १९७० पर्यंत, फिफाची ट्रॉफी FIFA चे माजी अध्यक्ष ज्युल्स रिमे ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती.