leander paes and rhea pillai
टेनिसपटू लिएंडर पेसने (Leander Pars Found Guilty In Domestic Violence Case) मॉडेल रिया पिल्लेचा कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत छळ केला असल्याचा ठपका ठेवत वांद्रे (Bandra) येतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रियाला दरमहा एक लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश टेनिसपटू लिएंडर पेसला दिले.
[read_also content=”हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर सुटकेचा आनंद – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी रोमानियामार्गे मायदेशी परतण्यासाठी रवाना https://www.navarashtra.com/world/first-batch-of-indian-students-studying-in-ukraine-coming-back-nrsr-245232.html”]
आठ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) असलेल्या लिएंअर पेस आणि मॉडेल रिया पिल्लेमध्ये खटका उडाला आणि रियाने पेसच्या विरोधात सन २०१४ मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पेसने वारंवार शाब्दिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ करून प्रचंड त्रास दिला असल्याची तक्रार रियाने केली आहे. पेसने मुलीचा ताबा मिळावा म्हणून वांद्रे न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे रियाने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत फिर्याद दाखल केली. रियाच्या पहिल्या लग्नाच्या सद्य परिस्थितीबाबत माहिती नसल्याचा दावा पेसच्यावतीने करण्यात आला. अभिनेता संजय दत्तसह तीचा पहिला विवाह झाला होता मात्र नंतर त्यांनी घटस्फोटाचा दावा दाखल केल्याचेही पसने म्हले होते. मात्र, रियाकडून या आरोपांचे खंडन करण्यात आले.
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात महानगर दंडाधिकारी कोमलसिंह राजपूत यांच्यासमोर काही दिवसांपूर्वीच निकाल दिला. त्या निकालाची प्रत उपलब्ध झाली असून रियाने केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले असून लिएंडरने रियाचा विविध प्रकारे छळ केला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि दोघांनाही एक मुलगी असून दोघींसाठी एक लाख रुपये मासिक पोटगी देण्याचे आणि घरभाडे म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने पेसला दिले. तसेच जर रियाने त्याच्या घरात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर संबंधित रक्कम मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.