Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तो मैदानात गाजवण्यासाठी सज्ज! निवृत्तीनंतर ३ वर्षांनी दिग्गज रॉजर फेडरर पुन्हा दिसणार ‘या’ स्पर्धेत खेळताना..

टेनिस चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्गज माजी टेनिसपटू रॉजर फेडरर निवृत्ती घेतल्यानंतर तब्ब्ल ३ वर्षांनंतर पुन्हा मैदानावर खेळताना दिसणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 11, 2025 | 07:29 PM
He's ready to shine on the field! Legendary Roger Federer will be seen playing in 'this' tournament again, 3 years after his retirement.

He's ready to shine on the field! Legendary Roger Federer will be seen playing in 'this' tournament again, 3 years after his retirement.

Follow Us
Close
Follow Us:

Roger Federer : टेनिसप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विम्बल्डनची सर्वाधिक ८ जेतेपदं नावावर करणारा यशस्वी खेळाडू रॉजर फेडरर निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणार आहे. रॉजर फेडररकडून ३ वर्षांपूर्वी निवृत्तीची घोषणा करण्यात आली होती. रॉजर फेडरर आता शांघाय मास्टर्स २०२५ ची स्पर्धा खेळणार असल्याची माहिती आहे. निवृत्ती जाही केल्यानंतर तो पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसेल. १० ऑक्टोबर रोजी किझोंग स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या ‘रॉजर अँड फ्रेंड्स’ सेलिब्रिटी डबल्स स्पर्धेत तो भाग घेणार असल्याचे फेडररकडून सांगण्यात आले आहे.

रॉजर फेडरर २०१७ नंतर पहिल्यांदाच शांघायमध्ये खेळताना दिसणार आहे. २०१७ मध्ये रॉजरने याच ठिकाणी टेनिसमधील त्याचे दुसरे एकेरी जेतेपद जिंकले होते. ही दुहेरी स्पर्धा विशेष असणार आहे. फेडररसह अनेक सेलिब्रिटी देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये स्पर्धेत प्रसिद्ध अभिनेता वू लेई, मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता डोनी येन आणि माजी डबल्स जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला झेंग जी हे देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला ग्रहण का लागले? रोहित शर्माच्या प्रशिक्षकाने केला ‘हा’ खळबळजनक खुलासा..

निवृत्तीनंतर तब्ब्ल ३ वर्षांनी रॉजर फेडरर खेळणार

एका प्रमोशनल व्हीडिओ दरम्यान रॉजर फेडररने सांगितले की, “नमस्कार, मी रॉजर आणि शांघाय मास्टर्ससाठी किझोंग स्टेडियममध्ये परत आल्याने मला खूप आनंद होत असून शांघाय हे नेहमीच माझ्यासाठी एक विशेष ठिकाण राहिलं आहे. येथील चाहते जबरदस्त आहेत आणि इथल्या आठवणी अविस्मरणीय अशा आहेत.”

शांघाय मास्टर्स १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. गतवर्षी खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद जानिक सिनर याने पटकावले होते. ज्याने अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचचा ७-६ (४), ६-३ असा पराभव केला होता. २०२२ मध्ये लेव्हर कप दरम्यान फेडररने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याचा प्रतिस्पर्धी आणि मित्र असणाऱ्या राफेल नदालसह खेळताना त्याने त्याचा अखेरचा डबल्स सामना जॅक सॉक आणि फ्रान्सिस टियाफो विरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्यांना ४-६, ७-६ (२), ९-११ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा : IND vs ENG :’जे घडले ते विसरून पुढील काही महिने…’, निराशाजनक इंग्लंड मालिकेनंतर करुण नायरने व्यक्त केली आशा..

रॉजर फेडररची टेनिस कारकीर्द

रॉजर फेडररने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपदं आपल्या नावावर केली आहेत. ज्यामध्ये विक्रमी आठ विम्बलडन जेतेपदांचा समावेश आहे. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये फेडररने स्टॅन वॉवरिंकासह पुरूष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये एकेरीत रौप्यपदकाही कमाई केली होती.

Web Title: Legendary roger federer will be seen playing again 3 years after retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 07:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.