Lucknow Super Giants : आज लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजीची सुरुवात केली. कर्णधार केएल राहुलने आज संयमी खेळी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीला आलेल्या केएल राहुलने 41 चेंडूत 55 धावा ठोकून मोठी खेळी केली. त्यानंतर पड्डीकल याला तुषाराने पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. मायकल स्टोयनिसने 22 चेंडूत 28 धावांची संयमी खेळी केली. त्यानंतर दीपक हुडा याने 11 धावा करून तंबूचा रस्ता धरला.
29 चेंडूत 75 धावांची मोठी खेळी
आज निकोलस पूरन याने 29 चेंडूत 75 धावांची मोठी खेळी केली. त्यानंतर अर्शद खान याने खाते न उघडता तंबूचा रस्ता धरला. आयुष बोधनी आणि कृणाल पांड्या यांनी नाबाद राहत संघाच्या धावसंख्येत 34 धावांची भर टाकली.
In sublime touch tonight 👌
Rohit Sharma gets to his 5️⃣0️⃣ with a superb maximum 💪
Follow the Match ▶️ https://t.co/VuUaiv4G0l #TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/PVV51veAKi
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
215 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीने 61 धावांची खेळी केल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे.
पावसाच्या व्यत्ययानंतर डावाला सुरुवात झाली. परंतु, आज सलामीला रोहित शर्मा आणि डेव्हीड ब्रेव्हीस आले होते. परंतु, डेव्हीड 23 धावा करून पॅव्हेलिनमध्ये परतला. नंतर आलेला सूर्या आज कोणताही प्रकाश पाडू शकला नाही. सूर्या शून्यावरच तंबूत परतला. इंशात किशन, नेहाल वढेरा आणि कर्णधार हार्दिक पांड्या आज विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. परंतु, शेवटच्या फळीत आलेला नमन धीर आज धमाकेदार फलंदाजी करीत 28 चेंडूत 68 धावांची मोठी खेळी केली. परंतु, त्याची झुंज अपयशी ठरली. मुंबई 196 धावाच करू शकली.