मणिपाल टायगर्स प्लेयर्स सेलिब्रेशन व्हिडिओ : हरभजन सिंगच्या नेतृत्वाखालील मणिपाल टायगर्सने लीजेंड्स लीग क्रिकेटचे विजेतेपद मिळवले आहे. मणिपाल टायगर्सने अंतिम फेरीत अर्बनआयज हैदराबादचा पराभव केला. त्याचवेळी या विजयानंतर मणिपाल टायगर्सच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. मणिपाल टायगर्सचा कर्णधार हरभजन सिंगने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार हरभजन सिंगसह मणिपाल टायगर्सचे खेळाडू ट्रॉफीसह विजय साजरा करताना दिसत आहेत.
मणिपाल टायगर्सचा कर्णधार हरभजन सिंगची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. लिजेंड्स लीग क्रिकेटच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, मणिपाल टायगर्सने अर्बनआयज हैदराबादचा ५ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अर्बनआयज हैदराबादने २० षटकांत ५ गडी गमावून १८७ धावा केल्या. अर्बनआयज हैदराबादसाठी रिकी क्लार्कने ५२ चेंडूत ८० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय गुरकीरत सिंगने ३६ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या.
Hip hip hurray! ?
LLC Trophy finds a new home with the victorious @manipal_tigers after a dazzling win against the Urbanrisers! ?#LegendsLeagueCricket #LLCT20 #BossLogonKaGame pic.twitter.com/sMgj13fq0j
— Legends League Cricket (@llct20) December 9, 2023
अर्बन ईगल्स हैदराबादच्या १८७ धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाजीला आलेल्या मणिपाल टायगर्सने १९ षटकांत ५ गडी गमावत १९३ धावा करत सामना जिंकला. मणिपाल टायगर्सकडून असाेला गुणरत्नेने २९ चेंडूत ५१ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. याशिवाय रॉबिन उथप्पा, चॅडविक वॉल्टन, अँजेलो परेरा आणि थिसारा परेरा यांनी उपयुक्त योगदान दिले. अर्बनआयज हैदराबादकडून स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक ३ बळी घेतले. जेरोम टेलर आणि शादाब जकाती यांनी १-१ विकेट घेतली.