बुधवारी 29 मे रोजी फोर्ट लॉडरडेल, फ्ला येथे अटलांटा युनायटेड विरुद्ध इंटर मियामी यांच्यामध्ये सामना पाहायला मिळाला. या सामन्यांमध्ये अटलांटा युनायटेडने इंटर मियामी यांच्यावर 3-1 असा विजय मिळवला. कालचा विजय मिळवून नऊ विजयासह मालिकेचा शेवट केला. या सामन्याची संध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. 31 मार्च रोजी शिकागो फायरवर 3-0 ने विजय मिळविल्यानंतर अटलांटाला पहिला विजय मिळवून देण्यासाठी ब्रॅड गुझानच्या जागी जोश कोहेनने चार सेव्ह केले.
[read_also content=”T-20 विश्वचषकात सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जिंकणारा भारताचा विराट कोहली अव्वल स्थानावर https://www.navarashtra.com/sports/indias-virat-kohli-tops-the-list-with-most-player-of-the-match-awards-in-t-20-world-cup-540324.html”]
अटलांटा युनायटेड गुणतालिकेत सध्या 12 व्या स्थानावर आहेत तर इंटर मियामी सध्या अव्वल स्थानावर आहेत. अटलांटा युनायटेडची मागील वर्षभरातमध्ये त्याची कामगिरी चांगली नव्हती. त्याचबरोबर त्यांना मागील आठवड्यामध्ये त्यांना लॉस एन्जेलिसकडून 1-0 असा पराभव पत्करावा लागला होता.
मेस्सीचा यंदाच्या सीझनमध्ये 11 वा गोल होता. लुईस सुआरेझने संघाला आघाडी मिळवून दिली. इंटर मियामीचा संघ 34 गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर सिनसिनाटी 33 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बुधवारी रात्री सिनसिनाटीला नॅशव्हिलकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे अव्वल स्थान मिळवण्याची संधी हुकली. थियारेने 73व्या मिनिटाला वायलीचा क्रॉस दारातून फिरवून अटलांटाला दोन गोलचा फायदा मिळवून दिला आणि विजय मिळवला.