परभणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) परभणी (Parabhani) शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर सोमवारी मध्यरात्री जीवघेणा चाकू हल्ला (Knife Attack) झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू (Death) झाला. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला झाला.
परभणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील हे काही मित्रांसह वसमत रोड (Basmat Road) परिसरातील शिवराम चित्र मंदिराच्या बाजूस रात्री गप्पा मारत बसले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून (Minor Cause) एका व्यक्तीसोबत त्यांचा वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत सचिन पाटील यांना समोरच्या व्यक्तीने चाकूने भोसकले. या हाणामारीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परभणी शहरात खळबळ उडाली आहे. हाणामारी राजकीय वादातून झाली असावी, असा अंदाज पोलीस घेत आहेत.