Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसदेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक येणार.., केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती; काय असणार तरतुदी?

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक मांडले जाईल असे क्रीडा मंत्री मनसुख मांडवीयायांच्याकडून सोमवारी सांगण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 15, 2025 | 03:56 PM
National Sports Bill will be introduced in Parliament.., Union Sports Minister Mansukh Mandaviya informed; What will be the provisions?

National Sports Bill will be introduced in Parliament.., Union Sports Minister Mansukh Mandaviya informed; What will be the provisions?

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक मांडले जाईल असे क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांनी सोमवारी सांगितले. युवा व्यवहार विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी उपक्रमाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना मांडवीया यांनी सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला की, बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यापासून रोखले जाणार नाही.

मांडवीय म्हणाले, हे विधेयक येत्या अधिवेशनात संसदेत सादर केले जाईल. मी काही दिवसांत त्यासंबंधी अधिक तपशील देईन. हे विधेयक देशातील क्रीडा प्रशासकांसाठी अधिक जबाबदारी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते, ज्यामध्ये नियामक मंडळाची तरतूद आहे. या मंडळाला सुशासनाशी संबंधित तरतुदींचे पालन करून राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSFs) मान्यता देण्याचा आणि त्यांना निधी वाटप करण्याचा अधिकार असेल.

हेही वाचा : Sexual harassment case : गोलंदाज यश दयालला मोठा दिलासा! अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून अटकेवर बंदी

द्विपक्षीय सामन्यांसाठीच सरकारची वेगळी भूमिका

पुढील महिन्यात होणारी पुरुषांची आशिया कप हॉकी स्पर्धा (बिहार), नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी एफआयएच ज्युनियर वर्ल्ड कप (तामिळनाडू) आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारी ज्युनियर शूटिंग वर्ल्ड कप (नवी दिल्ली) हे प्रमुख क्रीडा स्पर्धा आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यास कोणतीही अडचण नाही, मग ते क्रिकेट असो, हॉकी असो किंवा इतर कोणताही खेळ असो. पण जेव्हा द्विपक्षीय सामन्यांचा विचार केला जातो तेव्हा सरकारची भूमिका सर्वांना माहिती आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने भारतात होणाऱ्या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी मागितली आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळणार लवकरच व्हिसा

मांडविया म्हणाले, आम्ही पाकिस्तानला सांगितले आहे की आम्ही त्यांना आशिया कप आणि ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धांसाठी व्हिसा देऊ. आता ते संघ पाठवतात की नाही हे त्यांच्या सरकारवर अवलंबून आहे. आम्हाला कोणतीही अडचण नाही. दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत आणि प्रत्येक सहभागी संघाला समान वागणूक दिली जाईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा : AUS vs WI : खुपच लज्जास्पद…वेस्ट इंडिज 27 धावांवर ऑल आऊट झाल्यावर कर्णधार रागाने भडकला

तथापि, नियामक मंडळाच्या स्थापनेवरून वाद आहे आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेने (IOA) देखील त्याला विरोध आयओएचा असा विश्वास आहे की नियामक मंडळाच्या स्थापनेमुळे एनएफएससाठी नोडल बॉडी म्हणून त्यांची स्थिती कमकुवत होईल. एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले असले तरी भारतातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा सहभाग थांबवला जाणार नाही, या सरकारच्या भूमिकेचा मांडविया यांनी पुनरुच्चार केला आहे

Web Title: National sports bill to be introduced in parliament union sports minister mansukh mandaviya informed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • Indian Parliament

संबंधित बातम्या

संसदेत आरोग्यावरही दिले जाणार लक्ष! खासदार आणि पाहुण्यांना मिळणार सकस जेवण, Sugar Free खीर, ग्रील्ड चिकन आणि बरंच काही…
1

संसदेत आरोग्यावरही दिले जाणार लक्ष! खासदार आणि पाहुण्यांना मिळणार सकस जेवण, Sugar Free खीर, ग्रील्ड चिकन आणि बरंच काही…

Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते? कोण करतं मतदान? वाचा सविस्तर
2

Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते? कोण करतं मतदान? वाचा सविस्तर

लोकशाही प्रक्रियेत नक्की श्रेष्ठ कोण, न्यायपालिका की संसद? कोणाचा निर्णय अंतिम मानला जातो? वाचा सविस्तर
3

लोकशाही प्रक्रियेत नक्की श्रेष्ठ कोण, न्यायपालिका की संसद? कोणाचा निर्णय अंतिम मानला जातो? वाचा सविस्तर

Waqf Amendment Bill: काय आहे वक्फ कायदा; नव्या सुधारणा विधेयकाला का होतोय विरोध?
4

Waqf Amendment Bill: काय आहे वक्फ कायदा; नव्या सुधारणा विधेयकाला का होतोय विरोध?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.