Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Doha Diamond League 2025 : अखेर Neeraj Chopra चा थ्रो ९० मीटर पार! दोहा डायमंड लीगमध्ये रचला इतिहास..

भारत देशासाठी दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भाळफेकपटू नीरज चोप्राने अखेर इतिहास रचला आहे. त्याने दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये, ९०.२३ मीटर थ्रो करून राष्ट्रीय विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 17, 2025 | 07:41 AM
Doha Diamond League 2025: Neeraj Chopra's throw finally crosses 90 meters! History created in Doha Diamond League..

Doha Diamond League 2025: Neeraj Chopra's throw finally crosses 90 meters! History created in Doha Diamond League..

Follow Us
Close
Follow Us:

Doha Diamond League 2025 : भारत देशासाठी दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता ठरलेला भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी त्याच्या डायमंड लीग मोहिमेची सुरुवात एक इतिहास रचत केली आहे.  नीरज चोप्राने अखेर तो पराक्रम गाजवला ज्याची आशा लावून संपूर्ण देश त्याच्याकडे डोळे लावून बसला होता. दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये, नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भालाफेक करून एक नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. तसेच चोप्राने कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा देखील पार केला आहे. नीरज ने करून दाखवलेली ही दमदार कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी झेप तर ठरली आहेच, या सोबतच भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासातील एक मैलाचा दगड देखील ठरली आहे. नीरजने फेकलेल्या थ्रोने त्याने सर्व दिग्गजांना मागे टाकत पहिले स्थान पटकावून डायमंड लीग शर्यतीत मोठी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा : मुंबई T20 लीगचे वेळापत्रक बदलले! आता 4 जूनपासून स्पर्धा होणार

नीरज चोप्राचा मागील सर्वोत्तम थ्रो त्याने २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये  ८९.९४ मीटर फेकला होता. यावेळी दोहामध्ये, त्याने पहिल्या प्रयत्नात ८८.४४ मीटरने सुरुवात केली होती आणि तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटरचा ऐतिहासिक थ्रो करून मैदानावर आपला दबदबा राखला. किशोर जेना याने देखील यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता पण त्यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. नीरजने मिळवलेला हा विजय पॅरिस ऑलिंपिकपूर्वीच्या त्याच्या तयारीचा एक मजबूत असा संकेत देतो.

नीरज ९० मीटर क्लबमध्ये सामील होणारा पहिला भारतीय

नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटर फेकून इतिहास घडवला आहे. भालाफेकीत एखाद्या भारतीयाने हे अंतर पार करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी त्याची सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर राहिली  होती. नीरजच्या या यशामुळे त्याने डायमंड लीगच्या या टप्प्यात ८ गुणांची कमाई केली आहे. जर्मनीचा ज्युलियन वेबर ८९.०६ मीटर फेकून दुसऱ्या स्थानावर राहिला.

हेही वाचा : RCB vs KKR : विराट कोहलीच्या जर्सीची विक्री अचानक का वाढली? आरसीबी चाहत्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या प्रकरण

किशोर जेनाची कामगिरी

नीरजसोबत स्पर्धा करणाऱ्या भारतीय किशोर जेनाचा सर्वोत्तम थ्रो ७८.६० मीटर राहिला होता. पहिल्या प्रयत्नात त्याने ६८.०७ मीटर थ्रो फेकला,  दुसऱ्या प्रयत्नात सुधारणा झाली पण तिसऱ्या प्रयत्नात तो फाऊल ठरला. त्याला  या स्पर्धेत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.  त्याच्या कामगिरीवरून हे स्पष्ट होते की जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी त्याला त्याच्या थ्रोमध्ये सातत्य आणावे लागणार आहे.

Web Title: Neeraj chopra creates history by throwing 90 meters in the doha diamond league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 07:41 AM

Topics:  

  • Neeraj Chopra

संबंधित बातम्या

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..
1

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास.. 
2

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास.. 

शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन
3

शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग
4

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.