Neeraj Chopra's Ashwamedh Choukhur, conquering one empire after another! Created history by winning the Ostrava Golden Spike tournament..
Neeraj Chopra created history : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा एक एक स्पर्धांचे विजेतेपद जिंकत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने पॅरिस डायमंड लीगचे जेतेपद जिंकून इतिहास रचला होता. पुन्हा एकदा त्याने चेक रिपब्लिकमध्ये झालेल्या ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास लिहिला आहे. यासह, त्याने आणखी एका आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत देशाचे नाव रोशन केले आहे. नीरज चोप्राने ८५.२९ मीटर फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. त्याच वेळी, दुसरा कोणताही खेळाडू यापेक्षा जास्त अंतर कापू शकलानाही. दक्षिण आफ्रिकेचा डोव्ह स्मितने ८४.२९ मीटर भाला फेकून या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
या स्पर्धेत ग्रेनेडाचा पीटर अँडरसनने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८३.६३ मीटर पर्यंत भाला फेकला. सहा फेऱ्यांमध्ये त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली. या दरम्यान पीटरला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा : Photo : पाच शतकं झळकावूनही इंग्लंडकडून पदरी पराभव; टीम इंडियाने घातली ‘या’ लज्जास्पद ५ विक्रमांना गवसणी..
नीरज चोप्रा दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या स्थानावर राहिला होता, ज्या दरम्यान त्याने फाऊलने सुरुवात केली होती. नंतर त्याने ८३.४५ मीटरचा थ्रो फेकला. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने तिसऱ्या फेरीत ८५.२९ मीटर थ्रो फेकून ही स्पर्धा जिंकून नव्याने इतिहास रचला. २७ वर्षीय नीरज चोप्रा त्यानंतर ५ जुलैपासून बेंगळुरू येथे होणाऱ्या क्लासिकमध्ये देखील सहभागी होणार आहे. पीटर्स आणि रोहलर देखील त्यात खेळणार आहेत.
यापूर्वी, नीरज चोप्रा २०१८ मध्ये ओस्ट्रावा येथे झालेल्या आयएएएफ कॉन्टिनेंटल कपमध्ये सहभागी झाला होता. या दरम्यान, त्याने ८०.२४ मीटर थ्रो फेकून सहावे स्थान पटकावले होते. ओस्ट्रावा गोल्डन स्पाइकबद्दल सांगायचे झाल्यास तर, तो पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाला आहे. आता नीरजच्या कामगिरीने त्याचा आगामी स्पर्धेसाठी आत्मविश्वास चांगला राहण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : टीम इंडियाच्या पराभवा मागे कोण? समोर आले दोन खलनायक; इंग्लंडविरुद्ध महागात पडल्या ‘या’ चुका..
२०२५ हे वर्ष नीरज चोप्रासाठी चांगले ठरत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी, त्याने दोहा येथे झालेल्या डायमंड लीग दरम्यान ९०.२३ मीटर थ्रो फेकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करुण दाखवली होती. यापूर्वी, त्याची सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ ही राहिली होती. या काळात तो जर्मनीच्या ज्युलियन वेबरनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. वेबरने ९१.०६ मीटर थ्रो फेकला होता. दोहानंतर, नीरजने पोलंडमधील चोरझो येथे झालेल्या जानूझ कुसोसिंकी मेमोरियलमध्येही भाग घेतला होता, तिथे त्याने ८६.१२ मीटर फेकून दुसरे स्थान पटकावले होते.