इंग्लंड विरुद्ध भारत(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : इंग्लंडने लीड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ५ विकेट्सने पराभव करून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी मिळवली आहे. या विजयासह इंग्लंडने एक विक्रम देखील आपल्या नावावर नोंदवला आहे. आता बेन स्टोक्सच्या टीमने भारताविरुद्ध दोनदा ३५० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम केला आहे. २०२२ च्या सुरुवातीला देखील त्यांनी ही कामगिरी केली होती.
या सामन्यातील विजय इंग्लंड संघासाठी खास राहिला आहे. तर त्याच वेळी, हा पराभव टीम इंडियासाठी मनोबल तोडणारा ठरला आहे. तथापि, टीम इंडियाच्या फलंदाजांकडून लीड्स कसोटी सामन्यात शानदार कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले. टीम इंडियाकडून चार फलंदाजांनी शतके झळकावली. ज्यामध्ये विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने सलग दोन्ही डावात १०० धावांचा टप्पा पार केला. परंतु संघाला विजय मात्र मिळवता आला नाही.
हेही वाचा : ‘..पण जय शाहकडून हट्टीपणा अपेक्षित होता’, माजी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने दिली मोठी प्रतिक्रिया..
चमकदार फलंदाजी करून देखील, टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध सामना जिंकण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाच्या या लज्जास्पद पराभवामागील दोन कारणे आता समोर आली आहेत. यातील पहिले कारण म्हणजे अतिशय खराब दर्जाच क्षेत्ररक्षण. त्याच वेळी, दुसरे कारण म्हणजे गोलंदाजांनी अपेक्षेनुसार न केलेली कामगिरी ही होय. टीम इंडिया मालिकेत १-० ने पिछाडीवर असण्याचे ही दोन कारणं समोर आली आहेत.
लीड्स कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे भारताने केलेले सुमार क्षेत्ररक्षण. टीम इंडियाने अनेक झेल सोडून इंग्लंडच्या फलंदाजांना पुन्हा धावा काढण्याची संधी दिली. यशस्वी जयस्वालकडून या सामन्यात ४ सोपे झेल सोडण्यात आले. त्याच वेळी, टीम इंडियाने अनेक वेळा खराब क्षेत्ररक्षण देखील केले आहे.
हेही वाचा : Photo : पाच शतकं झळकावूनही इंग्लंडकडून पदरी पराभव; टीम इंडियाने घातली ‘या’ लज्जास्पद ५ विक्रमांना गवसणी..
लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न करण. बूमराह आणि जाडेजा वगळता कुणाला इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. प्रसिद्ध कृष्णा आणि सिराज यांनी काही बळी घेतले खरे परंतु त्यांना धावा रोखता आल्या नाहीत. तिथच इंग्लंड संघाचा विजय निश्चित होत गेला.