Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रँड मुंबई फायनलच्या समारोप समारंभाला चॅम्पियन्सचा गौरव करायला नीरज चोप्रा उपस्थित

तीन शहरांमधील 1,000 शाळांमध्ये असणाऱ्या 1,00,000 मुलांना सामावून घेत अ‍ॅथलेटिक्स किड्स कप ग्रँड मुंबई फायनलच्या पहिल्या सिझनचा समारोप ब्रॅंड अॅम्बेसिडर नीरज चोप्रा यांच्यासमवेत भविष्यातील चॅम्पियन्सचा गौरव करण्यात आला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 18, 2025 | 02:19 PM
ग्रँड मुंबई फायनलच्या समारोप समारंभाला चॅम्पियन्सचा गौरव करायला नीरज चोप्रा उपस्थित
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : दिनांक-शहरातील अग्रणी 500 तरुण खेळाडूंनी आपल्या कौशल्य आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत UBS समर्थित अ‍ॅथलेटिक्स किड्स कपने आपल्या ग्रँड मुंबई फायनलचा यशस्वी समारोप जिओ इंस्टीट्यूट अ‍ॅथलेटिक सेंटर, उळवे येथे केला. शारीरिक व्यायामाला चालना देत आणि पुढील पिढीतील चॅम्पियन्सना प्रेरित करत पहिल्या सिझनमध्ये या उपक्रमाने तीन शहरांमधील 1,000 शाळांमधून 1,00,000 मुलांना सहभागी करून घेतले. स्पर्धा triathlon-style स्वरूपात होती. त्यामध्ये 60 मी स्प्रिंट, लांब उडी आणि बॉल थ्रो हे प्रकार होते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वेळ, लाईव्ह समालोचन आणि मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रीडा वातावरणाचा अनुभव मिळाला. त्यायोगे त्यांना समृद्ध क्रीडा स्पर्धा, कार्यक्रमाचा आनंद घेता आला.

या कार्यक्रमास प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्सचे उपाध्यक्ष आणि माजी-एएफआय (अध्यक्ष) अदिल जे. सुमारिवाला; स्विस बिझनेस हब इंडियाचे प्रमुख फ्लोरिन म्युलर; स्विस-इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन प्रेसिडेंट स्वित्झर्लंड फिलिप एम. राईख; यूबीएस इंडियाचे हेड ग्रुप रिअल इस्टेट आणि सप्लाय चेन अँड चेअरमन हेराल्ड एगर; ऑलिम्पियन आनंद मेनेजेस; नेरोलॅकचे सीएचआरओ सुधीर राणे; रिलायन्स ट्रेझरीचे कश्यप मोदी; डेलॉइट, पार्टनर प्रसाद कुलकर्णी; भायखळा चर्चचे फादर अर्नेस्ट फर्नांडिस; स्ट्रायडर्स हेड कोच संतोष वर्गीस; 100 मी/ 200 मी खेळाडू अमलान बोरगोहाईन; 100mH/लाँग जंप अॅथलीट मौमिता मोंडल हे युवा खेळाडूंच्या यशाचा गौरव साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

ऑलिम्पिक चॅम्पियन आणि अॅथलेटिक्स किड्स कप ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर नीरज चोप्रा यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांच्या परिवर्तनशील प्रभावावर भाष्य केले: “अशा स्पर्धांमधून तरुण खेळाडूंना मिळणारे अनुभव अमूल्य असतात. उत्साह हाताळण्याची, उद्दिष्टे ठरवण्याची आणि स्पर्धा करण्याची शिकवण त्यांना संपूर्ण आयुष्यासाठी तयार करते.”

MI vs GG : WPL 2025 मध्ये हरमनप्रीत कौरचा संघ पहिल्या विजयाच्या शोधत, आज कमबॅक करण्याची सुवर्णसंधी

अ‍ॅथलेटिक्स किड्स कप हा उपक्रम मुलांमध्ये वाढणाऱ्या स्थूलतेच्या समस्येवर उपाय म्हणून तयार करण्यात आला आहे. धावणे, उडी मारणे आणि फेकण्याच्या मूलभूत क्रीडा क्रियांद्वारे त्यांना सक्रिय जीवनशैली अंगीकारण्यास प्रेरित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. शारीरिक तंदुरुस्तीच्या पलीकडे जात या उपक्रमाने शिस्त, चिकाटी, संघभावना आणि नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यास मदत केली आणि युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.

समाजाला सक्षम करण्यासाठी आणि युवकांच्या विकासाला चालना देण्यासाठी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित करत UBS ने अॅथलेटिक्स किड्स कप प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. युवा प्रतिभांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्याची संधी सुनिश्चित करत त्यांच्या सर्वांगीण विकासाला पाठबळ देण्यासाठीचा हा उपक्रम UBS च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.

Dspowerparts चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल श्नकेर या उपक्रमाबद्दल आपला उत्साह व्यक्त करताना म्हणाले, “युवा खेळाडूंमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर जीवनावश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करणाऱ्या अशा उपक्रमाचा शुभारंभ करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. अधिक निरोगी, अधिक आत्मविश्वास असलेली पिढी घडवण्यामध्ये अॅथलेटिक्स किड्स कप हे खेळाच्या सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे.”

UBS मधील इंडिया सर्विस कंपनीचे प्रमुख मॅथीअस श्चॅकल आपले विचार प्रकट करताना म्हणाले, “आम्ही भारताच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करण्यावर विश्वास ठेवतो आणि अॅथलेटिक्स किड्स कप हा उपक्रम युवक विकासाच्या प्रति आमची बांधिलकी दर्शवतो. या युवा खेळाडूंचा उत्साह आणि निर्धार, तसेच मैदानी वातावरणातील ऊर्जा यातून खेळ परिवर्तनशील ठरू शकतात आणि मुलांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम करू शकतात या आमच्या विश्वासाला बळकटी मिळते.” पहिल्या सिझनच्या यशस्वी समारोपानंतर, अॅथलेटिक्स किड्स कप आपला दुसरा सिझन एप्रिल 2025 मध्ये सुरू करणार आहे.

Web Title: Neeraj chopra present to felicitate the champions at the closing ceremony of the grand mumbai final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • Neeraj Chopra
  • Sports

संबंधित बातम्या

Smriti Mandhana Wedding: स्मृती नाही, तर पलाशने ढकलली लग्नाची तारीख पुढे; सिंगरच्या आईचा मोठा खुलासा, काय घडले नेमके?
1

Smriti Mandhana Wedding: स्मृती नाही, तर पलाशने ढकलली लग्नाची तारीख पुढे; सिंगरच्या आईचा मोठा खुलासा, काय घडले नेमके?

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित
2

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर
3

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर

Smriti Mandhana Wedding : “रडून रडून मला त्रास…” स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आईने सांगितले कारण
4

Smriti Mandhana Wedding : “रडून रडून मला त्रास…” स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आईने सांगितले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.