फोटो सौजन्य - शोएब मलिक सोशल मीडिया
शोएब मलिक : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सध्या त्याच्या जीवनामुळेच चर्चेत असतो, कारण मागील बऱ्याच वर्षांपासून त्याला पाकिस्तानी संघामध्ये स्थान मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वीच शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. यावेळी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर शोएब मलिकच्या प्रत्येक पोस्टला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेतल्यानंतर लगेचच पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. या लग्नानंतर मलिक यांच्यावर जोरदार टीका झाली होती. तथापि, लोक अजूनही मलिक यांच्यावर टीका करताना दिसतात, ज्याचा प्रभाव त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टवर दिसून आला.
सोशल मीडियावर भारतीय फलंदाज शोएब मलिकने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो आणि त्याची तिसरी पत्नी सना जावेद हे व्हॅकेशन साठी स्विझर्लंडला गेले आहेत तेथील त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. यावर नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलं आहे.
शोएब मलिकला याला आतापासूनच नाही तर नेटकरी जेव्हापासून त्याने टेनिसपटू सानिया मिर्झा हिला घटस्फोट दिला तेव्हापासून त्याच्या प्रत्येक फोटोला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, दोन देशांचा अपमान व्हावा म्हणून हा माणूस सनासोबतचा फोटो अपलोड करत आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, कितीही लाथा खाल्ल्या तरी कशी काय हिम्मत येते फोटो पोस्ट करण्याची… अशा अनेक कॉमेंट्स सोशल मीडियावर शोएब मलिक आणि त्याच्या पत्नीच्या अकाउंटवर येत आहेत.