ग्लेन फिलिप्सचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
कॅरिबियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये गयाना ॲमेझॉन वॉरियर्स विरुद्ध ट्रिनबागो नाइट रायडर्स सामन्यात न्यूझीलंडच्या ऑल राऊंडर असणाऱ्या ग्लेन फिलिप्सने सीमारेषेवर घेतलेल्या एका सुंदर आणि अप्रतिम कॅचने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने ट्रिनबागो नाइट रायडर्सला 186 रन्सचे टार्गेट दिले होते. या रन्सचा पाठलाग करण्यासाठी सुनील नारायण मैदानात उतरला होता. ड्वेन प्रिटोरियसच्या ओव्हरमध्ये एका बॉलवर सुनील नरेनने एक पूल शॉट मारला. हा शॉट थेट सिक्स जाईल असे सर्वांना वाटत होते.
A Catch So Good, #GlennPhillips was SHOCKED himself! 🤯 Watch #CPL 2026 LIVE on Star Sports! pic.twitter.com/48qMKcSUmS — Star Sports (@StarSportsIndia) September 1, 2026
तर दुसरीकडे डीप स्क्वेअर लेगवर फिल्डिंग करत असताना त्याने उजव्या बाजूला धावत जाऊन केवळ आपला हात मध्ये घातला आणि सहजपणे कॅच पकडला. हा कॅच इतका अद्भूत होता की झेल पूर्ण केल्यानंतर खुद्द फिलिप्सलाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो काही वेळ थक्क होऊन मैदानावरच हसत उभा राहिला होता. तसेच शॉट मारलेला सुनील नरेन देखील आश्चर्यचकित झाला होता.
१८२ रन्सचा पाठलाग करण्यासाठी सुनील नरेन ओपनर म्हणून खेळण्यासाठी आला. नरेन (१ धाव) स्वस्तात बाद झाल्याने ट्रिनबागोची सुरुवात खराब झाली. मात्र नबीने शानदार गोलंदाजी करत टीकेआरला केवळ 172 रन्सपर्यंत मजल मारता आली. हा शॉट जर सिक्स गेला असता तर सुनील नरेन नॉट आउट राहिला असता आणि या सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागू शकला असता.






