ग्लेन फिलिप्सचे शानदार शतक (फोटो- ट्विटर)
ग्लेन फिलिप्सने कसोटी क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक पूर्ण केले आहे. न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. तेव्हा ग्लेन फिलिप्सने शतकी खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यामुळे न्यूझीलंडने सन्मानजनक स्कोअर उभा केला. ग्लेन फिलिप्सने तीनही फॉर्मटमध्ये शतक पूर्ण केले आहे.
न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये कसोटी सामने खेळवले जात आहेत. सध्या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. सात नंबरवर ग्लेन फिलिप्स खेळण्यासाठी आला. त्याने संघाचा डाव सावरला.
What a contest to finish day one! Glenn Phillips walks off unbeaten on 49* with the team on 291/7.#ENGvNZ | 📸 @PhotosportNZ pic.twitter.com/9VyW7q8A06 — BLACKCAPS (@BLACKCAPS) June 17, 2026
ग्लेन फिलिप्सने शानदार शतकी खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. 135 बॉलमध्ये ग्लेन फिलिप्सने आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 18 फोर मारले. ग्लेन फिलिप्ससोबत टॉम ब्लंडेलने देखील 51 रन्सची अर्धशतकी खेळी पूर्ण केली. त्यामुळे ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने 391 रन्स केल्या.
या सिरिजमधील पहिला कसोटी सामना इंग्लंडने 115 रन्सने आपल्या नावावर केला आहे. सिरिज सुरू असतानाच केन विलियमसनने निवृत्ती जाहिर केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला आहे. ग्लेन फिलिप्स आतापर्यंत एकूण 18 कसोटी सामने खेळला आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याने 1000 रन्स पूर्ण केले आहेत.






