मुंबई : कतार येथे सुरु असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा (FIFA World Cup) आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामने ११ डिसेंबर पर्यंत खेळवण्यात आले असून यातून विजयी झालेल्या संघांमध्ये आता फायनल गाठण्यासाठी चुरस रंगणार आहे. अर्जेंटिना – क्रोएशिया आणि फ्रान्स – मोरोक्को यांसंघानंमध्ये १४ आणि १५ डिसेंबर रोजी उपांत्य फेरीतील सामने होणार आहेत. यातील विजेत्या दोन संघांमध्ये रविवारी १८ डिसेंबर रोजी फायनल सामना खेळवण्यात येईल.
क्रोएशिया संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी क्रोएशियाला १९९८ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. २०१८मध्ये हा संघ उपविजेता ठरला. फ्रान्स संघाने १९९८ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक पटकावला होता. त्यानंतर २०१८ मध्ये रशिया येथे झालेल्या विश्वचषकात त्याने दुसऱ्यांदा यश मिळवले. आता फ्रान्सचा संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी पर्यंत करणार आहे.
[read_also content=”फिफा विश्वचषकाला गालबोट! कतारमध्ये दोन पत्रकारांचा मृत्यू https://www.navarashtra.com/sports/fifa-world-cup-two-journalists-suddenly-died-in-qatar-352820.html”]
मोरोक्को हा आफ्रिका खंडातील देश असून या संघाने पोर्तुगालला हरवत विश्वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली आहे.आता अंतिम फेरीत पोहोचण्याचे ध्येय त्यांचे असेल. तर दोन वेळा विश्वचषक जिंकण्याची किमया करणारा अर्जेंटिना संघाला १९८६नंतर त्यांना एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. लिओनेल मेस्सीलाही विश्वकरंडक जिंकून देता आलेला नाही. मात्र यंदा मेस्सी त्याचे हे स्वप्न पूर्ण करणार का? हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.