Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs NAM, T20 World Cup : कोलंबोमध्ये साहिबजादा फरहानचा शतकी तडाखा! पाकिस्तानचा नामिबियासमोर 200 धावांचा डोंगर 

२०२६ च्या आयसीसी टी२० विश्वचषकातील ३५ वा सामना कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लब येथे पाकिस्तान आणि नामीबिया यांच्यात खेळला जात आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने नामिबियासमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 18, 2026 | 05:24 PM
PAK vs NAM, T20 World Cup: Sahibzada Farhan hits century in Colombo! Pakistan's 200-run mountain against Namibia

PAK vs NAM, T20 World Cup: Sahibzada Farhan hits century in Colombo! Pakistan's 200-run mountain against Namibia

Follow Us
Close
Follow Us:

PAK vs NAM, T20 World Cup 2026 : कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लब येथे पाकिस्तान आणि नामीबिया यांच्यात २०२६ च्या आयसीसी टी२० विश्वचषकातील ३५ वा सामना खेळला जात आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने साहिबजादा फरहानच्या नाबाद शतकाच्या जोरावर ३ गडी गमावून १९९ धावा उभ्या केल्या आणि नामिबियासमोर २०० धावांचे टार्गेट दिले.

हेही वाचा : अरेरे पाकवर काय ही वेळ! ‘आम्ही भांडीही धुतली…’ कर्णधाराने हॉटेलमध्ये मिळालेल्या वागणुकीची कहाणी उलगडली

पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य असल्याचे ठरवून दिले. सलामीवीर साहिबजादा फरहानच्या नाबाद शतकामुळे, पाकिस्तानने चालू टी२० विश्वचषकातील गट टप्प्यातील ३५ व्या सामन्यात ३ विकेट्स गमावून १९९ धावा केल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. तथापि, कर्णधार सलमान आणि फरहान यांच्या भागीदारीमुळे संघ बळकट स्थितीत आला. त्यानंतर पाकिस्तानने सलग सलमान आणि ख्वाजा नाफे यांची विकेट गमावली. परंतु शेवटी, शाबाद खानने चौथ्या विकेटसाठी नाबाद ८१ धावांची महत्वाची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. साहिबजादा फरहानने ५८ चेंडूचा सामना करत  ११ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा  फटकवल्या. तर सलमानने २३ चेंडूत ३८ धावा केल्या आणि शाबाद खानने नाबाद ३६ धावा फटकवल्या.

हेही वाचा : Pakistan च्या पंतप्रधानांना नेमका कोणी केला फोन? India सोबत T20 वर्ल्डकप मॅच खेळायला झटक्यात झाले तयार

या सामन्यात एक गोष्ट लक्षात घायायला हवी की, जर नामिबियाने या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले तर २०२४ प्रमाणेच अमेरिका पुन्हा एकदा सुपर ८ मध्ये पाकिस्तानची जागा घेईल. तसेच, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर पाकिस्तान सुपर ८ मध्ये स्थान मिळविण्यास पात्र ठरणार आहे. कारण पाकिस्तानचे पाच गुण होणार आणि त्यामुळे संघ सुपर ८ मध्ये सहज प्रवेश करेल.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), अलेक्झांडर वोल्शेंक, जेजे स्मित, झेन ग्रीन (कर्णधार), रुबेन ट्रम्पेलमन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड स्कोल्झ, जॅक ब्रासेल

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (कर्णधार), ख्वाजा नाफे, शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, सलमान मिर्झा, उस्मान तारिक

Web Title: Pak vs nam t20 world cup pakistan sets 200 run target against namibia on the strength of sahibzada farhans century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.