Pakistan cricket in mourning! Star player passes away; He breathed his last in Birmingham at the age of 95
Pakistani cricketer Wazir Mohammad passes away : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट जगतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू वजीर मोहम्मद यांचे निधन झाले आहे. त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी बर्मिंगहॅम, यूके येथे वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ पाकिस्तानच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायावर देखील शोककळा पसरली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी वजीर मोहम्मद यांना श्रद्धांजली वाहिली असताना म्हटले की, क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना नेहमीच लक्षात ठेवले जाईल.
हेही वाचा : IND VS AUS : ‘विराटच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी हरभजन सिंगची भविष्यवाणी
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी श्रद्धांजली वाहिली असताना त्यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की वजीर मोहम्मद यांची क्रिकेटमधील सेवा नेहमीच लक्षात ठेवली जाईल. तसेच एका निवेदनात पीसीबीने म्हटले आहे की त्यांना माजी पाकिस्तानी कसोटी फलंदाजाच्या निधनाने खूप दुःख झाले असून त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांकडून यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. वजीर मोहम्मद यांचे योगदान केवळ डाव आणि धावांपुरते मर्यादित नसून त्यांनी त्यांच्या अनुभवाने आणि ज्ञानाने अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
वझीर मोहम्मद यांनी १९५२ मध्ये पाकिस्तानकडून खेळताना भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९५९ मध्ये ढाका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. केवळ सात वर्षांच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये त्यांनी पाकिस्तानला मोठा गौरव मिळवून दिला. शिवाय, वझीर यांनी इंग्लंडमध्ये अनेक वर्षे काउंटी क्रिकेट खेळले आहे.
वझीर मोहम्मद यांनी पाकिस्तानकडून २० कसोटी सामने खेळले असून ८०१ धावा केल्या आणि त्याच्या फलंदाजीने संघाला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची फलंदाजीची सरासरी २७.६२ इतकी राहिली होती आणि या काळात त्यांनी दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकवली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची कामगिरी शानदार राहिली आहे. त्यांनी १०५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांनी ४०.४० च्या सरासरीने ४,९३० धावा केल्या आहेत. याशिवाय, त्यांनी ११ शतके आणि २६ अर्धशतके लागावली आहेत. जी त्याच्या सातत्यपूर्ण आणि स्थिर कामगिरी दाखवून देते.
हेही वाचा : IND vs WI, 2nd Test मियाँ मॅजिक चल गया..! मोहम्मद सिराजने घातला धुमाकूळ; २०२५ मध्ये केला ‘हा’ कारनामा