मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Siraj creates record : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्याट दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज शानदार कामगिरी करताना दिसत आहे. मिया मॅजिक या वर्षी चांगलीच करिष्माई फॉर्ममध्ये आहे, त्याने एक विक्रम केला आहे. मोहम्मद सिराज २०२५ वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. सिराजने या वर्षी एकूण ३७ कसोटी बळी टिपले आहेत.दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात सिराजने तीन विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा : Ind vs WI : चेंडू लागताच बॅट हातातून निसटली, KL Rahul झाली नको तिथे दुखापत; पहा VIDEO
मोहम्मद सिराजची कामगिरी
२०२५ मध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अव्वल स्थानी विराजमान आहे. आतापर्यंत, सिराजने आठ सामने खेळले असून २६.६४ च्या सरासरीने त्याने ३७ बळी घेतले आहेत. त्याने दोन वेळा पाच बळी घेतले आहेत.
ब्लेसिंग मुझारबानी
झिम्बाब्वेचा स्टार वेगवान गोलंदाज, ब्लेसिंग मुझारबानी या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. २०२५ पर्यंत, मुझारबानीने नऊ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने २८.६३ च्या सरासरीने ३६ बळी घेण्याची किमया साधली आहे. कसोटी डावात सात बळी घेणारा पहिला झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज होण्याचा विक्रम देखील त्याने नोंदवला आहे.
मिशेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने देखील २०२५ मध्ये शानदार कामगिरी करत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले आहे. त्याने २०२५ च्या वर्षात आतापर्यंत ७ कसोटी सामन्यांमध्ये १७.२४ च्या सरासरीने २९ विकेट्स घेतल्या आहेत.
नॅथन लिऑन
ऑस्ट्रेलियाचा रहस्यमय फिरकी गोलंदाज नॅथन लिऑन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने २०२५ मध्ये आतापर्यंत, लिऑनने ६ कसोटी सामने खेळले असून त्याने २४.०४ च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर दोन वेळा चार विकेट्स देखील जमा आहेत.
हेही वाचा : IND vs WI 2nd Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला! भारत विजयापासून 58 धावा दूर; वेस्ट इंडिजला देणार क्लीन स्वीप?
जोमेल वॉरिकन
वेस्ट इंडिजचा स्टार फिरकी गोलंदाज असणारा जोमेल वॉरिकन या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने या वर्षी आतापर्यंत ६ कसोटी सामन्यांमध्ये १८.३४ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन वेळा पाच विकेट्स देखील घेतल्या आहेत.