फोटो सौजन्य- X
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची तिरंदाज भजन कौरने जबरदस्त प्रर्दशन करत प्री क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. आज भजनने तिच्या दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळविला आणि भारताकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राऊंड ऑफ 16 मध्ये जाणारी पहिली तीरंदाज ठरली आहे. तीरंदाजीचे सामने हे बाद फेरीचे (नॉकआऊट) सामने असतात ज्यामुळे जर स्पर्धेत टिकून राहयचे असल्यास प्रत्येक सामन्यात विजय आवश्यक असतो.
राऊड ऑफ 64
भारताच्या भजन कौरचा वैयक्तिक प्रकारातील पहिला सामना इंडोनेशियाच्या शिफा कमल होता या सामन्यात भजनने शानदार कामगिरी करत 7-3 असा विजय संपादन केला. या विजयासह भजन कौरने राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला.
राऊड ऑफ 32, अंकिता भकतच्या पराभवाचा घेतला बदला
आजच भजन कौरचा राऊंड ऑफ 32 चा सामना होता. तिचा हा सामना पोलंडच्या वायलेता म्याझोरविरुध्द होता. भजन पोलंडच्या म्याझोरवर 6-० असा दणदणीत विजय मिळविला. पहिल्या सेटमध्ये आणि तिसऱ्या सेटमध्ये प्रत्येकी एकदा 10 गुण मिळविले तर दुसऱ्या सेटमध्ये दोनदा 10 नंबरवर लक्ष्य साधत भजनने म्याझोरविरुद्ध संपूर्ण वर्चस्व राखले. या वर्चस्वामुळे 28-23, 29-26, 28-22 असा सरळ सेटमध्ये विजय संपादन केला. या विजयासह भजन ने अंकिताच्या पराभवाचा बदला घेतला. भारताच्या अंकिता भकतचा राऊंड ऑफ 64 मध्ये वायलेता म्याझोरने 6-4 असे पराभूत केले होते.
Bhajan Kaur 6️⃣ – 0️⃣ Wioleta 🇵🇱 in R32
Bhajan beats Polish archer with brilliant accuracy and moves to Round of 16 🇮🇳♥️#Archery #Paris2024Olympic pic.twitter.com/LCK5Eo58el
— The Khel India (@TheKhelIndia) July 30, 2024
3 ऑगस्टला राऊंड ऑफ 16 चा सामना
या विजयासह भारताकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राऊंड ऑफ 16 मध्ये जाणारी भजन पहिली तिरंदाज ठरली आहे. भजन 3 ऑगस्टला इंडोनेशियाच्या डियानडा कोइरुनिसा हिच्या विरुध्द राऊंड ऑफ 16 चा सामना खेळणार आहे