
फोटो सौजन्य - The Olympic Games
गोल्डन बॉय नीरज चोप्रा : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून संपूर्ण देशाला मोठ्या आशा आहेत आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने जगाला दाखवून दिले की का तो डिफेंडिंग चॅम्पियन आहे. आज नीरज चोप्राने दुसऱ्या गटामधील पहिला थ्रो त्याने केला आणि चमत्कार करून दाखवला. भारतीय स्टार नीरज चोप्राचा पहिला थ्रो त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टाकला आणि त्याच्या भाल्याने ८९.३४ मीटर अंतर पार करून फायनल गाठली आहे.
Happy Neeraj Chopra day, to all those who celebrate. 🇮🇳 pic.twitter.com/TLRXRAByrt — The Olympic Games (@Olympics) August 6, 2024
भारताच्या प्रेक्षकांना नेहमीच नीरज चोप्राकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यावर तो टोकियो ऑलिम्पिकनंतर त्याने बरेच त्याच्या खेळामध्ये सुधारणा केली आहे, त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडलची कमाई केली आहे. यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.
NEERAJ CHOPRA QUALIFIED FOR FINALS 89.34mpic.twitter.com/gZKxGCivIq — The Khel India (@TheKhelIndia) August 6, 2024
किशोर जेनाने पहिला थ्रो ८०.७३ मीटर त्याचा भाल्याने अंतर पार केले आहे तर दुसरा थ्रो त्याचा फाऊल झाला आहे. त्यानंतर आता त्याने तिसरा थ्रो ८०.२१ मीटर टाकला आहे. आता तो फायनलसाठी पात्र ठरणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची फायनलची स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार रात्री ११:५५ pm ला सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षक नीरज चोप्राकडून आणखी एक सुवर्ण पदकाची अपेक्षा करत आहेत. कारण त्याने क्वालीफिकेशन राउंडमध्ये ८९:३४ मीटर भाला फेकला आहे.