फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : भारताचे पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या पॅरा खेळाडूंनी दमदार कामगिरी करून इतिहास घडवला. टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने १९ पदक खात्यात जमा केले होते. आता भारताच्या खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २९ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ७ सुवर्ण पदक, ९ रौम्य पदक आणि १३ कांस्यपदकांचा समावेश आहे. मेडल टॅलीमध्ये भारत ७ सुवर्णपदकासह १८ व्या स्थानावर राहिला. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने ६ मेडल मिळवले. यामध्ये एकही सुवर्ण पदक नव्हते. त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये विक्रम रचत भारताच्या पॅरा खेळाडूंची कामगिरी पाहतं भारत सरकार पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम देणार आहे. हे बक्षीस रक्कम किती असणार आहे, याची घोषणा क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना किती बक्षीस रक्कम मिळणार यावर एकदा नजर टाका. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ज्यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे, त्यांना ७५ लाख रुपये दिले जाणार आहेत, तर ज्यांनी सिल्वर मेडल नावावर केले आहे त्यांना ५० लाखांचे बक्षीस रक्कम दिले जाणार आहे. ब्रॉन्झ मेडल ज्यांनी मिळवले आहे त्यांना ३० लाख बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. या बक्षीस रक्कमची घोषणा स्वतः क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे.
Sports Minister Mansukh Mandaviya has announced Cash Reward 💰 for Paralympics Medalist 🎖️
🥇 Gold Medalists: ₹75 Lakh!
🥈 Silver Medalists: ₹50 Lakh!
🥉 Bronze Medalists: ₹30 Lakh! pic.twitter.com/bmoqINSzCo— The Khel India (@TheKhelIndia) September 11, 2024