फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : आजचा हा दिवस पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील भारतीय ॲथलेटिक्ससाठी ऐतिहासिक दिन होऊ शकतो. आजचा दिवस खेळाडूंसाठी त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी सुद्धा आनंदाचा असणार आहे. कारण आज भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरू शकतो. भारताला सर्वाधिक मेडल जिंकण्याची सुवर्णसंधी आज प्राप्त झाली आहे. आज भारताचे पॅरा खेळाडूंने अनेक स्पर्धांमध्ये मेडलसाठी उतरणार आहेत. पॅरा बॅडमिंटनमध्ये तीन मेडल पक्के केले आहेत, कारण भारताच्या पॅरा शटलरनी हे फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर अनेक भारताचे दिग्गज ॲथलेटिक्स मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी भारतीय प्रेक्षकांच्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू आणि टोकियो सिल्वर मेडलिस्ट सुहास यथिराज याने सेमीफायनलमध्ये सुकांत कदमला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. तुलसीमथी मुरुगेसन या पॅरा शटलरने भारताच्या बॅडमिंटनपटूला सेमीफायनलमध्ये पराभूत करून फायनलचा मार्ग मोकळा केला आहे. त्याचबरोबर नितेश कुमार याने सुद्धा जपानच्या बॅडमिंटन खेळाडूला सेमीफायनलमध्ये पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे आज हे तीन मेडल पक्के झाले आहेत, या तीनही खेळाडूंचा जर पराभव देखील झाला तर त्यांचे सिल्वर मेडल पक्के आहे.
भारताचे चार पॅरा शटलर ब्रॉन्झ मेडल सामन्यामध्ये खेळताना दिसणार आहेत. यामध्ये सुकांत कदम, मनीषा रामदास, नित्या श्री सिवन/शिवराजन सोलाईमलाई मिक्स टीम आणि नित्या श्री सिवन हे ॲक्शनमध्ये असणार आहेत.
भारताचा स्टार पॅरा भालाफेकपटू सुमित अंतील आज ॲक्शनमध्ये असणार आहे, या स्पर्धेमध्ये भारताचे आणखी दोन खेळाडू असणार आहेत. सुमित अंतील, सनीप सरगार, संदीप हे तीनही खेळाडू भालाफेक स्पर्धेमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड चॅम्पियन दिपथी जीवनजी सुद्धा ४०० मीटर धावणे मध्ये सहभागी होणार आहे. भारताचे पॅरा आर्चर शीतल देवी आणि राकेश कुमार आज त्यांचा मिक्स टीम इव्हेंट खेळणार आहेत.