फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी भारताचा स्टार सुमित अंतिल आणि गोळा फेकपटू भाग्यश्री जाधव हे ध्वजवाहक होते. पहिल्या दिवशी भारताच्या बॅडमिंटनपटूनी कमाल केली आहे. पॅरीसच्या पहिल्या दिनी अनेक बॅडमिंटन खेळाडू अॅक्शनमध्ये दिसले. यावेळी अनेक खेळाडूंनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी कमाल करून दाखवली आहे. पहिल्या दिनी कोणत्या ॲथलेटिक्सने कशी कामगिरी केली यावर नजर टाका.
1) भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सुहास यथिराज याने पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या रामदानी हिकमतला 21-7 आणि 21-5 असे पराभूत करुन सहज विजय मिळवला आहे.
2) टीम इंडीयाचा सुकांत कदम याने मलेशियाच्या मोहम्मद अमीन बुरहानुद्दीन याला 17-21, 15-21, 22-20 पराभव करून सामना नावावर केला.
3) ब्राझिलच्या बॅडमिंटनपटूला भारताच्या तरुण ढिल्लोनने 21-17 21-19 असे पराभूत करून दमदार विजय मिळवला.
4) भारतची युवा महिला बॅडमिंटनपटू पलक कोहलीने फ्रान्सच्या मिलेना सुरेउला पराभूत करून पॅरीसमध्ये पहिला विजय मिळवला.
5) भारताची स्टार बॅडमिंटनपटू तुलसीमथी मुरुगेसन हिने इटलीच्या रोसा मोरको हिला 21-9, 21-11 असे पराभूत करून पहिला विजय मिळवला.
6) भारताची बॅडमिंटनपटू आणि वर्ल्ड नंबर दोन मनिषा रामदास हिने फ्रान्सच्या बॅडमिंटनपटूला 8-21, 21-6, 21-19 असे पराभूत करून विजय मिळवला.
7) नित्या श्री सिवनने पहिल्या सामन्यामध्ये अमेरीकेच्या जॅायसी सायमन हिला पराभूत करून दमदार विजय मिळवला.
भारताची युवा महिला तिरंदाज शितल देवीने 720 गुणांपैकी 703 गुण मिळवून क्वालिफिकेशन राऊंडमध्ये दुसरे स्थान मिळवले. तर सरिता हिने 720 गुणांपैकी 682 गुण मिळवून क्वालिफिकेशन राऊंडमध्ये नववे स्थान मिळवले. टोकीयो पॅरालिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक विजेता हरविंदर सिंह याने 720 पैकी 637 गुण मिळवून क्वालिफिकेशन राऊंडमध्ये नववे स्थान मिळवले. राकेश कुमार यांनी 720 पैकी 641 गुण मिळवून क्वालिफिकेशन राऊंडमध्ये तिसरे स्थान गाठले. तर श्याम सुंदरने 631 गुण मिळवून १७ वे स्थान गाठले. भारतीय पॅरा आर्चर पूजा जातयन हिने 585 गुण मिळवून क्वालिफिकेशन राऊंडमध्ये सातवे स्थान मिळवले.