फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Paris Paralympics 2024 LIVE : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा आज सहावा दिवस आहे, भारताच्या पॅरा ॲथलेटिक्सने पाचव्या दिवशी आठ मेडल नावावर केले आहेत. आतापर्यत भारताच्या खात्यात १५ मेडल जमा झाले आहेत. यामध्ये आतापर्यत भारताने १५ मेडल खात्यामध्ये जमा केले आहेत. यामध्ये ३ सुवर्ण, ५ रौम्य आणि ७ कास्यपदकांचा समावेश आहे. काल पॅरा बॅडमिंटनचे इव्हेंट्स संपले आहेत. आणखी पाच दिवस पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु असणार आहे. आज भारताचे काही दमदार ॲथलेटिक्स मेडलसाठी लढणार आहेत. आजच्या दिवसभरामधील पॅरिस पॅरालिम्पिकच्या भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात यावर प्रेक्षकांची नजर असणार आहे. यासाठी तुम्ही नवराष्ट्र डिजिटलवर वेळोवेळी अपडेट पाहू शकता.
03 Sep 2024 03:44 PM (IST)
महिला वैयक्तिक रिकर्व्हमध्ये भारताची पॅरा आर्चर पूजाने राउंड ऑफ १६ मध्ये तुर्कीच्या तिरंदाजाला पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Pooja beats Sengul 6-0 in Pre- Quaterfinals of Women's Individual Recurve Open
Quaterfinals at 8:30 PM IST Today
Well Done Pooja 🇮🇳♥️ pic.twitter.com/IxM7feHmEN
— The Khel India (@TheKhelIndia) September 3, 2024
03 Sep 2024 03:39 PM (IST)
R8 - महिला 50m रायफल 3 पोझिशन SH1 क्वालिफिकेशन राउंडमध्ये सातवे स्थान गाठून अवनी लेखाराफायनलसाठी पात्र.
Prone 97 + 97 + 98 + 98 = 390
Standing 92 + 96 + 96 + 97 = 381
Kneeling 96 + 94 + 96 + 99 = 385
03 Sep 2024 03:08 PM (IST)
भारताची गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव सध्या पॅरिस पॅरालिम्पिकच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. भाग्यश्रीचे थ्रो अनुक्रमे ७.०५, ७.२३, ६.४२, ६.९०, ७.०० आणि ७.२८ असे होते.
03 Sep 2024 01:33 PM (IST)
भारताची स्टार पॅरा शुटर अवनी लेखारा सध्या R8 - महिला 50m रायफल 3 पोझिशन SH1 क्वालिफिकेशन राउंडमध्ये खेळत आहे. यामध्ये पहिल्या राऊंडनंतर म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये गुडघे टेकून शूटिंग करणं या फेरीपर्यत सहाव्या स्थानावर आहे.
03 Sep 2024 01:07 PM (IST)