फोटो सौजन्य - JIO Cinema/सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा आज पाचवा दिवस आहे, आजच्या दिवसभरामध्ये भारताचे अनेक खेळाडू ॲक्शनमध्ये असणार आहेत. यामध्ये भारताच्या पॅरा बॅडमिंटन खेळाडूंनी कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. आज भारताचे एका दिवसात सर्वाधिक पदक येण्याची शक्यता आहे. आज भारताचे तीनहून अधिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर अनेक अथेलेतीक्स आज ॲक्शनमध्ये असतील. भारताची वर्ल्ड चॅम्पियन देप्थी जेवांजी ही आज ॲक्शनमध्ये असणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये भारताचे खेळाडू कशाप्रकारे कामगिरी करतात यावर एकदा नजर टाका, या संदर्भात सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे.