फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
आरसीबीचे काळे सत्य : आयपीएलमध्ये अजुनपर्यत एकही ट्रॉफी न जिंकलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal Challengers Bengaluru) संघाबद्दल संघाच्या माजी खेळाडूने मोठा खुलासा केला आहे. सायरस सेज पॉडकास्टवर भारताचा माजी खेळाडू पार्थिव पटेल याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League 2024) नवीन खेळाडूंची कशा प्रकारे वागणूक केली जाते याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पार्थिव पटेलने (Parthiv Patel) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ब्लॅक बुक खोलून त्याचे काळे सगळे संपूर्ण भारताला सांगितले आहे. संघात फक्त स्टार खेळाडूंनाच कसा मान मिळतो आणि इतर खेळाडूंकडे विशेष लक्ष दिले जात नाही, हे त्याने सांगितले. या गोष्टींमुळेच संघ आजपर्यंत एकही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही, असे पार्थिवचे मत आहे.
सायरस सेज पॉडकास्टवर पार्थिवला आरसीबीच्या संघाबद्दल विचारण्यात आले त्यावेळी त्याने सांगितले की, जेव्हा तो संघाचा भाग होता तेव्हा तिथे संघ संस्कृती नव्हती. या सर्व गोष्टींमुळे संघ आजपर्यंत ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. यष्टीरक्षक फलंदाजाने तो संघाचा भाग असतानाच्या कालावधीबद्दल सांगितले. मी आरसीबीसाठी खेळलो, संघ नेहमीच व्यक्तींबद्दल असतो, तिथल्या संघाबद्दल नाही. मी संघात होतो तेव्हा विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांची विशेष इज्जत केली जायची, तिथली संघ संस्कृती नाही आणि म्हणूनच त्यांनी आजपर्यंत ट्रॉफी जिंकली नाही.
आयपीएल २०२४ मधील आरसीबीच्या (RCB) कामगिरीचा विचार केला तर, संघाने सुरुवातीचे सलग सात सामने गमावले होते. त्यानंतर सलग सामने जिंकून संघ सुपर-४ मध्ये पोहोचला होता. आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६ सामने जिंकून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले होते. एलिमिनेटर सामन्यांमध्ये संघाला राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ते सुपर-४ मधून बाहेर झाले होते. आयपीएल २०२४ ची कमान फाफ डुप्लेसीकडे सोपवण्यात आली होती.