आयपीएल 2024 पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करून मोठा बदल केला आहे. फ्रँचायझीने शेवटच्या हंगामात म्हणजे 2023 मध्ये पदभार स्वीकारलेल्या एडन मार्करामला काढून टाकले आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात हैदराबादने कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. या किमतीत विकला गेल्याने कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
कमिन्सला मोठ्या रकमेत विकत घेतलेल्या सनरायझर्स हैदराबादने आता त्याच्यावर नवीन जबाबदारी दिली आहे आणि त्याला 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 साठी कर्णधार बनवले आहे. सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या कर्णधाराची घोषणा केली. हैदराबादने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि लिहिले, “आमचा नवा कर्णधार पॅट कमिन्स.”
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 मध्ये एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली खेळताना अत्यंत खराब कामगिरी केली होती. मार्करामच्या नेतृत्वाखाली संघाला 14 लीग सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकता आले. संघ गुणतालिकेत तळाच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होता. गेल्या मोसमातील खराब कामगिरी पाहता संघ व्यवस्थापनाने हा बदल केला आहे. कमिन्स हा सध्याच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला २०२३ च्या विश्वचषकात चॅम्पियन बनवले.
#OrangeArmy! Our new skipper Pat Cummins ?#IPL2024 pic.twitter.com/ODNY9pdlEf
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 4, 2024
कमिन्स हैदराबादचे नशीब बदलू शकेल का?
त्याच्या नेतृत्वाखाली, कमिन्सने एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला कसोटी चॅम्पियन बनवले. अशा परिस्थितीत यावेळी कमिन्स आपल्या कर्णधारपदाखाली हैदराबादला चॅम्पियन बनवेल, अशी आशा चाहत्यांना असेल. आता कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबाद काय करू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.