Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy Final 2025: पाटीदार-राठोड जोडीच्या शतकासमोर दक्षिण झोनचे गोलंदाज निष्प्रभ; मध्य झोनकडे 235 धावांची आघाडी

बीसीसीआयने आयोजित केलेल्या दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रजत पाटीदार आणि यश राठोडने शतकं झळकवली आहेत. त्यांच्या शतकाच्या जोरवार मध्य झोनने दक्षिण झोनवर २३५ धावांची आघाडी घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 12, 2025 | 09:09 PM
Duleep Trophy Final 2025: South Zone bowlers helpless in the face of Patidar-Rathore duo's century; Central Zone leads by 235 runs

Duleep Trophy Final 2025: South Zone bowlers helpless in the face of Patidar-Rathore duo's century; Central Zone leads by 235 runs

Follow Us
Close
Follow Us:
  • दुलीप करंडक स्पर्धेत मध्य झोन आणि दक्षिण झोन आमनेसामने 
  • दुसऱ्या दिवसाअखेर मध्य संघाची २३५ धावांची आघाडी
  • मध्य संघाकडून रजत पाटीदार आणि यश राठोड यांची शतके 

Central Zone vs South Zone : बीसीसीआयने आयोजित केलेल्या दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मध्य विभागा आणि दक्षिण विभाग यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात मध्य विभागाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर मध्य विभागाने दक्षिण विभागावर २३५ धावांची आघाडी मिळवली आहे. मध्य विभागासाठी अंतिम सामन्यात रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी शतकं झळकावली आहेत.

बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे हा अंतिम सामना खेळला जात आहे. अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात केवळ १४९ धावांवर सर्वबाद झाला. तर दुसरीकडे, दुसऱ्या दिवसानंतर मध्य विभागाने ५ गडी गमावून ३८४ धावा उभारल्या आहेत. यासह आता मध्य विभागाने २३५ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘…म्हणूनच पाकिस्तान भारताकडून हरतो’, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा संघाला घरचा आहेर

पाटीदार-राठोड जोडीची शतके

मध्य विभागाचे दोन फलंदाज रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी एकामागून एक शतक झळकावून दक्षिण विभागावर आपली पकड अधिक मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. सेंट्रल झोनचा कर्णधार रजत पाटीदारने ११२ चेंडूत शतक झळकावले. यासह, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाटीदारचे हे १५ वे शतक ठरले आहे. शतक ठोकल्यानंतर पाटीदार माघारी परतला. झाला. पाटीदारने ११५ चेंडूंचा सामना करत १०१ धावांची खेळी साकारली ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार ठोकले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यश राठोडने देखील दक्षिण विभागाला शतकी तडाखा दिला. राठोड १३७ धावा करून खेळत आहे. या दरम्यान यश राठोडने १८८ चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने ११ चौकार आणि एक षटकार खेचला. यश राठोड आणि रजत पाटीदार यांच्यात १६७ धावांची मोठी भागीदारी देखील झाली.

हेही वाचा : Plane Emergency Landing : क्रिकेटचा देव तेंडुलकरच्या विमानाची आपत्कालीन लॅंडींग! पहा जंगलातील थरारक व्हिडिओ

दुसऱ्या दिवशी ही परिस्थिती होती

मध्य विभागाने ५० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला अक्षय वाडकर २२ धावा करून माघारी परतला तर शुभमन शर्माही ६ धावा काढून झटपट बाद झाला. दानिश मालेवार अर्धशतकी खेळी करून पॅव्हेलीयनकडवे परतला. त्याने ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी संघाची सूत्रे हाती घेतली आणि संघाला मोठी आघाडी उभारून दिली. रजत पाटीदार १०१ धावा काढून बाद झाला. तर यश राठोड १३७ धावा काढून खेळत आहे. तसेच त्याच्यासोबत सरांश जैन ४७ धावा काढून नाबाद आहे.

Web Title: Patidar rathore duo strengthens the middle zone in duleep trophy final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • Duleep Trophy 2025

संबंधित बातम्या

 Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली 
1

 Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली 

Duleep Trophy 2025 : नारायण जगदीसनच्या शतकाने दक्षिण विभागाला तारले! उपांत्य फेरीत उत्तर विभागाचे गोलंदाज निष्फळ 
2

Duleep Trophy 2025 : नारायण जगदीसनच्या शतकाने दक्षिण विभागाला तारले! उपांत्य फेरीत उत्तर विभागाचे गोलंदाज निष्फळ 

Duleep Trophy 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडचा शतकी तडाखा! टीम इंडियाला दिला मोठा इशारा; पश्चिम विभाग मजबूत स्थितीत 
3

Duleep Trophy 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडचा शतकी तडाखा! टीम इंडियाला दिला मोठा इशारा; पश्चिम विभाग मजबूत स्थितीत 

Duleep Trophy मध्ये ६ फलंदाज LBW..! झारखंडच्या मनीषीचा पदार्पणात रचला इतिहास! असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय खेळाडू
4

Duleep Trophy मध्ये ६ फलंदाज LBW..! झारखंडच्या मनीषीचा पदार्पणात रचला इतिहास! असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.